तुझ्या तोंडून दुसऱ्या कुणाची प्रशंसा एैकते
तुला नाही माहित माझ्या मनात काय चालते
स्मित तुझं जेव्हा इतर कुणासाठी फुलते
तेव्हा मात्र माझ्या मनात संशय पाझर फुटते
मला माहित असते, तुझे काहीही नसते
तुला वाटते अशीकशी बायको माझी संकुचित
पण तुझ्या प्रेमाच्या शब्दांवाचून असते ती वंचित
माझा नवऱ्यावर विश्वास आहे ठामपणे सांगते
पण उगाच कसलीतरी भीती मनात बाळगते
मला माहित असते, तुझे काहीही नसते
तू वागतो मनमोकळा, थोडा साधाभोळा
मात्र तुझ्या स्वभावाने माझ्या पोटात येतो गोळा
इतरांच्या चांगल्या गुणांच कौतुक तुला सुचते
तेव्हा मात्र माझ्या विचाराचं भलतंच वारं वाहते
मला माहित असते, तुझे काहीही नसते
डोळ्याआड असला की पुर्ण विश्वास असतो
कलियुगात जणू सीतेचा प्रभू रामचंद्र भासतो
तुझ्याबरोबर जेव्हा जेव्हा बाहेर मी फिरते
नजर मात्र तुझ्यावर सतत येवून स्थिरावते
मला माहित असते, तुझे काहीही नसते
माझ्या मनाचा हाच एक व्यर्थ आजार
तू मात्र त्याचेच मानायला पाहिजे आभार
कारण माझ्या अशा वागण्याने तुझं मन थांबते
घरचं सोडून बाहेरचं खाण्यापासून घाबरते
मला माहित असते, तुझे काहीही नसते
- रानमोती / Ranmoti