Search This Blog

Wednesday, August 12, 2020

तुझमे समाना है..!

बेरूख जिंदगी से
खुदको संवारना है
पूरी शिद्दत से
तुझमे समाना है

गमोके दायरे से
अब निकलना है
ईश्कके रास्ते से
तुझमे समाना है

तेरे अपनो से
तुझे चूराना है
मेरी किस्मत से
तुझमे समाना है

शब्दोके तिर से
दिलको भेदना है
आखोकी बांतो से
तुझमे समाना है

सांसोकी आहट से
तुझे मिलाना है
अपनी परछाई से
तुझमे समाना है

रूंहकी गुप्तगू से
रास रचाना है
छूनेकी आस से
तुझमे समाना है

तेरी समझ से
खुदको बनाना है
अपनी ख्वाईशो से
तुझमे समाना है

पूरी शिद्दत से
तुझको पाना है
प्यारके ईजहार से
तुझमे समाना है 

- रानमोती / Ranmoti

त्यासी आज वंदन


नसे तो पावन 
वृत्ती ज्याची रावण
सुखी करतो जनजन
त्यासी आज वंदन 
 
इहलोकी कर्म जाणतो 
सेवार्थ नेम साधितो 
खऱ्या मानवा नमतो
त्यासी आज वंदन 

द्वेष क्लिष्टा त्यागून 
परमार्थ पाहून 
सर्वांसी आपले करतो
त्यासी आज वंदन 

भगवंता तोचि आवडे
ज्यासी दुर्गुण वावडे 
अनाठाई टाळतो 
त्यासी आज वंदन 

- रानमोती / Ranmoti
******************

Saturday, August 8, 2020

बघा कशी विज धावली..!




बघा कशी विज धावली...

पाण्याची घेऊन शक्ती
जनरेटरची लावून उक्ती
ताराच्या जाळ्यात व्यापली
आधुनिक मीटरात मापली
बघा कशी विज धावली
माझ्या घराच्या दिव्याची माउली

टर्बाईनला देऊन वाफ
कोळसा जणू झालाया बाप
उंच उंच टॉवरला गोवली
येऊन सबस्टेशनला चालली
बघा कशी विज धावली
माझ्या घराच्या दिव्याची माउली

जागोजागी रोवून खांब
गेलीया गावोगावी लांब
धावून हळूहळू दमली
जाऊन डिपीवर रमली
बघा कशी विज धावली
माझ्या घराच्या दिव्याची माउली

तपासून सारे आरोग्य
झाली ती वापरण्या योग्य
चोरट्याने मधात हेरली
टाकून आकुडे चोरली
बघा कशी विज धावली
माझ्या घराच्या दिव्याची माउली

झालीया जगाचा प्राण
वापराचे ठेऊया भान
भरुया वेळेवर बिल
थकबाकी ठेवूया निल
बघा कशी विज धावली
माझ्या घराच्या दिव्याची माउली

- राणी अमोल मोरे




सारांश



ग्राम पंचायती आणि सरकारी शाळांच्या
भिंतीवर सुविचारांची रंगोटी झाली
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश सुसंस्कृत आणि सुशिक्षित झाला

वकिलीच्या अनेकांना पदव्या मिळाल्या
स्वतंत्र न्याय प्रणालीचा स्विकार झाला
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश न्यायप्रिय आणि अन्यायमुक्त झाला

कोट्यावधींची बजेट सादर झाली
योजनांचा सर्वत्र थर साचू लागला
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश समृद्ध आणि सधन झाला

पर्यावरण कार्यक्रमाला हजेऱ्या वाढल्या
‘झाडे लावा, झाडे जगवा’ जप सुरु झाला
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश हिरवागार आणि प्रदुषणमुक्त झाला

प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांना चालना दिली
जाहिरातींचा सपाटा भलताच वाढला
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश सामान्य माणसाचा आवाज झाला

सर्वच धर्मांना आणि भाषांना आश्रय दिला
साऱ्या सणाला सुट्ट्याही मिळाल्या
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश धर्मनिरपेक्ष आणि ऐकतावादी झाला

सिनेमागृहात राष्ट्रगीत अनिवार्य झाले
"वन्दे मातरम्" नारेही गुंजू लागले
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश आता भक्तीमय आणि देशप्रेमी झाला

रानमोती काव्यसंग्रहातून.....


Thursday, August 6, 2020

येशील तू परतुनी..


सांजवेळी पाखरे विसाव्या सांजावली
रिमझिम रविकिरणे क्षितिजात मावळली
चांदणी शुक्रासह पुन्हा नभी उगवली
येशील तू परतुनी आस मना लागली

स्मितफुलांची भावना मुखसावळ्या शोभली
ओठस्त शब्दसुमने मधुशर्करेसम भासली
करताच लाडिवाळ जणू नयनकृती भारावली
येशील तू परतुनी आस मना लागली

अस्मिताचा रविराज प्रीत तुझीच भावली
स्वप्न क्षितीजांचे ना मेहरबान कुणाची सावली
बंधिस्त माझ्या इच्छांना पंख देऊनी चालली
येशील तू परतुनी आस मना लागली

बांधली वारुळे..



माखून शाई पत्रावळ वाढीला नारोबा
बांधली वारुळे अन बसविले नागोबा
झपाटले संप्रद प्रजा सहज भोगी
सर्वांसी भावे प्रसारक आदी रोगी

रचाया वारूळ करती जालीम घाई
प्रजारोग्य नसे गहन करती दिरंगाई
लावुनी दानतिजोरी चढविती कळस
ओढुनी अफाट वैभव बनती सर्वसरस

घेऊनिया नामव्रत फोफावती लूटमार 
आंधळ्यास ठाऊक नसे हे छुपे वार
झाले सारेच मुके ना कुणा शब्द फुटे
करती गाजावाजा अनाठाई वर्ग खोटे

सोडून आद्य कर्मन रुजवी व्यर्थ व्यापार
गुंतवून निष्कपट नंदी सांगती विकार
कातिण विनती जाळे स्वतः का अडकावे
संप्रद एकच सत्यनिष्ठ उरी घट्ट जकडावे

- रानमोती

Sunday, August 2, 2020

मायेचं बंधन..



बहीण बघते भावाची वाट
ओवाळणी कराया सजले ताट
बहरून आली श्रावण पौर्णिमा
दिसता बहीण सुखी झाला चंद्रमा

सुरेख राखीला रेशीम धागे 
भाऊ उभा बहिणीच्या पाठीमागे
चमचम राख्या हातावर फुलती
बहिणी येऊन माहेरात रमती

बहिणीस असे भावाचा लळा
ओवाळून लावी कपाळी टिळा
हातावर सजवून मायेचं बंधन
आदराने करी भावास वंदन

पेढ्याचा खाऊन अमृत घास
भाऊ बहिणीस भेट देई खास
आनंदुनी भावाबहिणीचं मन
उजळून जाई रक्षाबंधन सण

- रानमोती

Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts