Search This Blog

Saturday, August 8, 2020

बघा कशी विज धावली..!




बघा कशी विज धावली...

पाण्याची घेऊन शक्ती
जनरेटरची लावून उक्ती
ताराच्या जाळ्यात व्यापली
आधुनिक मीटरात मापली
बघा कशी विज धावली
माझ्या घराच्या दिव्याची माउली

टर्बाईनला देऊन वाफ
कोळसा जणू झालाया बाप
उंच उंच टॉवरला गोवली
येऊन सबस्टेशनला चालली
बघा कशी विज धावली
माझ्या घराच्या दिव्याची माउली

जागोजागी रोवून खांब
गेलीया गावोगावी लांब
धावून हळूहळू दमली
जाऊन डिपीवर रमली
बघा कशी विज धावली
माझ्या घराच्या दिव्याची माउली

तपासून सारे आरोग्य
झाली ती वापरण्या योग्य
चोरट्याने मधात हेरली
टाकून आकुडे चोरली
बघा कशी विज धावली
माझ्या घराच्या दिव्याची माउली

झालीया जगाचा प्राण
वापराचे ठेऊया भान
भरुया वेळेवर बिल
थकबाकी ठेवूया निल
बघा कशी विज धावली
माझ्या घराच्या दिव्याची माउली

- राणी अमोल मोरे




8 comments:

  1. Very nice. 👌🏻👌🏻👏🏻👏🏻🍫keep it up👍🏻

    ReplyDelete
  2. The first in a kind technical poem... Good

    ReplyDelete
  3. अप्रतिम.. वीज आणि कविता खूप छान.

    ReplyDelete
  4. Good Poem. Kids in Video has lot of potential and good delivering quality. Pls promote him as he is having bright future. I like poem and his way of expressions.
    Keep him permitted at all.
    Well done

    ReplyDelete
  5. 👌👌Excellent... Very nicely conceptualized poem...Very confident boy in video... Really appreciable..

    ReplyDelete
  6. लय भारी.. विज धावली

    ReplyDelete
  7. विज घरापर्यंत पोहाचान्यापर्यंतचे तंतोतंत विश्लेषण.. सुंदर

    ReplyDelete
  8. एक नंबर.. आज समजल वीज घरालोक कशी येते ते.छान.

    ReplyDelete

Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.

Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts