वऱ्हाडाच्या मातीतलं
अस्सल वऱ्हाडी सोनं
कॉमेडीच्या क्षेत्रातलं
हुकमी झालं नाणं
बोलीभाषेचा गोडवा
अटकेपार नेला
सहज विनोद करून
भारत हिरो झाला
आव नाही चेहऱ्यावर
साधा भोळा संवाद
यश जरी खिश्याशी
सर्वांना देतो दाद
कशी असो स्क्रिप्ट
नेतो तो धकवून
चला हवा येऊ द्यात
जातो आम्हा हसवून
नुकतंच चाखवलं
भारत्याचं भरीत
लॉकडाऊन आमचं
घालवलं खुशीत
हसणं आणि दादाचं
नातं रंगून आलं
सिनेमात वऱ्हाडीचं
महत्त्व वाढवून गेलं
आजवर इतकं
नाही कोणी भावलं
ज्यानं विदर्भाचं
नाव मोठं केलं
म्हणून दादा तुझा
आम्हा अभिमान
वाढो तुझ्या रूपाने
विदर्भाची शान
- राणी अमोल मोरे (रानमोती)