बातम्याच बातम्या..!
जगाच्या बातम्या, बातम्याच जग
संपूर्ण विश्वच जणू बातम्या
वर्तमान पत्रात बातम्या
साप्ताहिकात बातम्या
मासिकात बातम्या
टीव्हीवर बातम्या
फेसबूकवर बातम्या
ट्वीटरवर बातम्या
व्हाट्सअपवर बातम्या
इकडे-तिकडे, जिकडे-तिकडे, सगळीकडे बातम्याच बातम्या
लालूच्या अटकेची
मोदीच्या फटक्याची
राज-उद्धवच्या चुरशीची
पवारच्या पावरची
भूजबळच्या समतेची
संजयच्या गेमची
शहाच्या सिटीझनची
शाहीनबागच्या आंदोलनाची
केजरीवालच्या मोफत विजेची
तर राहुलच्या मंदिर प्रवेशाची दखल घेणारी बातमीच
तरुणांचा जल्लोष
स्वतंत्र सैनिकांचा जयघोष
जेष्ठांना आधार
पाल्यांवर संस्कार
आतंकवाद्यांवर वार
स्त्रीयांवरचे अत्याचार
दुषीतांचे दुराचार
पाकिस्तानचे कुविचार
संत महात्म्यांचे सुविचार
तर प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडविणारी बातमीच
दारू, बार, दोन नंबरचे धंदे
कधी हिंदू मुस्लिमांचे दंगे
बँका लुटणारे, दारू ढोसणारे
सीमेवरून देशात घुसणारे
गावा गावातील चोऱ्या
उडान टप्पुंच्या हाणामार्या
नदीला आलेला पूर
दुष्काळग्रस्तांची कुरकुर
बेरोजगारांना नोकरी
तर भुकेलेल्या भाकरी मिळवून देणारी बातमीच
अर्थमंत्र्यांचे वार्षिक बजेट
शेतकऱ्यांना योजनांचे पॅकेट
अमेरिकेचा वाढता डॉलर
सिने तारकांचा ग्लेमर
सणावारांची उधळण
रुपयांची घसरण
शेअर मार्केटची उतरण
अडाणी-अंबानीची कुजबूज
टाटा-गोदरेजची सूझबूझ
तर विदेशी कंपन्यांची थेट गुंतवणूक सांगणारी बातमीच
सुनेची जाळपोळ
नागरिकांची होरपळ
राजकर्त्यांचे घोटाळे
नागरिकांचे वाटोळे
मोदी-माल्यांचे पळून जाने
रातोरात नोटा बंदी होणे
धोनी-युवराजचे क्रिकेट
सानिया-सायनाचे रॅकेट
आतंकवाद्यांचे विघ्न
तर जम्मू-काश्मीरचे प्रश्न मांडणारी बातमीच
कुणाला आदरांजली
कुणाला श्रद्धांजली
कुणाला गौरवांजली
कुणाला वाढदिवसांच्या सुभेच्छा
सामान्यांच्या मनातील इच्छा
अश्या ह्या विविधरंगी बातम्या
सांगाव्या, लिहाव्या, ऐकाव्या, पाहाव्या तेवढ्या कमीच
कारण त्याच रंगवतात सकाळ, दुपार अन संध्याकाळ
दाखवतात भूतकाळ, वर्तमानकाळ अन भविष्यकाळ
त्याच असतात दिवसाच्या चोवीस तासात
अन आठवड्याच्या सात दिवसात, फक्त बातम्याच बातम्या