आभाळ आज धो धो रडाया लागलं
जाण्याने तुझ्या मन त्याचंही दुभागलं
भन्नाट सुटला वारा हा असा कसा
घेऊन गेला आमच्या लाडक्या माणसा
नयनी ढगांच्या घट्ट काळोख दाटला
घेऊन गेला आमच्या लाडक्या माणसा
नयनी ढगांच्या घट्ट काळोख दाटला
विजांनी कडकड दु:खी टाहो फोडला
संयमी शांत तुझ्या कर्माचे सुत्र
गावचा एक तुच लाडका भुमीपुत्र
गावचा एक तुच लाडका भुमीपुत्र
छोट्याश्या जीवनाला तू केलं मोठं
विरोधकांनाही प्रेम दिलं जाणवलं छोटं
विरोधकांनाही प्रेम दिलं जाणवलं छोटं
गेलास तू चुकवून काळजाचा ठोका
कोणी सांभाळावं तुझ्या भाबडया लोका
दीन जणांचा कैवारी तू श्रध्देची आशा
मृत्युच्या वादळाने केली आज निराशा
कोणी सांभाळावं तुझ्या भाबडया लोका
दीन जणांचा कैवारी तू श्रध्देची आशा
मृत्युच्या वादळाने केली आज निराशा
गावच्या मातीत तुझ्या यशाच्या खुणा
तुझ्याविना विकास कोण घडवेल सांग ना
परतुनी ये पुन्हा आमच्या वाट्याला
मुखाग्नी दे दु:खाच्या प्रचंड साठ्याला
तुझ्याविना विकास कोण घडवेल सांग ना
परतुनी ये पुन्हा आमच्या वाट्याला
मुखाग्नी दे दु:खाच्या प्रचंड साठ्याला
रिकामी जागा भरुन कशी निघणार
अंधारले डोळे सांग कधी तु दिसणार
अंधारले डोळे सांग कधी तु दिसणार
जाण्याने तुझ्या मन त्याचंही दुभागलं
आभाळ आज धो धो रडाया लागलं
- रानमोती / Ranmoti