आपलं गड्या ऑफिस लय हाय भारी
गोष्ट सांगतो त्याची आज तुले खरी
उन्हा पाण्यात धाव धाव नित्य मी सुटतो
घेत नाही सुट्टी रोज हजर राहतो
कामात न्हाय सोडत जराबी सैल
जणू मी ऑफिसात बनतो कोलूचा बैल
किती केली मरमर भेटत नाही बढती
पाहून घरचे सारेच मलाच रागा भरती
जेवण करतो जणू घोडा खातो घास
घामाने अंगाचा नुसता येतो वास
दमतो करून रोज तोच तो नाच
नाही खात कुणाकडून कवडीची लाच
डोळ्यात माझ्या स्वप्न होती हजार
ऑफिसच्या राजकारणात झाली हद्दपार
कोणी आहे अधिकारी तर कोणी लाचार
काही करतात काम काही नुसतेच संचार
हीच आहे कामाची नित्य दिनचर्या
यात माझ्या हाडाचा लय वाजतो बोऱ्या
पायता पायता वेळ अशीच जाईल निघून
एक दिवस रिटायरमेंट बाहेर देईल झोकून
घेत नाही सुट्टी रोज हजर राहतो
कामात न्हाय सोडत जराबी सैल
जणू मी ऑफिसात बनतो कोलूचा बैल
किती केली मरमर भेटत नाही बढती
पाहून घरचे सारेच मलाच रागा भरती
जेवण करतो जणू घोडा खातो घास
घामाने अंगाचा नुसता येतो वास
दमतो करून रोज तोच तो नाच
नाही खात कुणाकडून कवडीची लाच
डोळ्यात माझ्या स्वप्न होती हजार
ऑफिसच्या राजकारणात झाली हद्दपार
कोणी आहे अधिकारी तर कोणी लाचार
काही करतात काम काही नुसतेच संचार
हीच आहे कामाची नित्य दिनचर्या
यात माझ्या हाडाचा लय वाजतो बोऱ्या
पायता पायता वेळ अशीच जाईल निघून
एक दिवस रिटायरमेंट बाहेर देईल झोकून
©Rani Amol More