बनू अजिंक्य पताका गडाची
आम्ही मराठी हाडा मासाची
सळसळत्या रक्त बाण्याची
उडत उडत कुठवर जगायचे
आता जगणे आमुचे ध्येयाचे
घे भरारी स्वप्ने बांधुनी उराशी
एकीचे बळ धरू हात हाताशी
बनू अजिंक्य पताका गडाची
आम्ही बछडे या महाराष्ट्राची
खळखळ उसळत्या सागराची
धमन्यात आमुच्या जयजयकार
हृदयात निरंतर झंकार
उघडत्या पापण्यांचे स्वप्न जिंकण्याचे
माझे तुझे तिचे त्याचे सर्वांचे
- रानमोती / Ranmoti
जय महाराष्ट्र
ReplyDelete