Search This Blog

Friday, November 19, 2021

'रानमोती' काव्यसंग्रहास मराठी साहित्य मंडळाचा “साहित्य भूषण” पुरस्कार


अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळाच्या वतीने यावर्षीचा साहित्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा "साहित्य भूषण" पुरस्कार विदर्भातील वाशिमच्या मातीशी नाळ असलेल्या मुंबईच्या युवा साहित्यिका राणी अमोल मोरे - उलेमाले यांच्या "रानमोती" काव्यसंग्रहास म्हसवड जिल्हा सातारा येथे शुक्रवार, दिनांक १९ नोव्हेम्बर २०२१ रोजी आयोजित तिसऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला. 

सदर, साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत मा. राजरत्न आंबेडकर यांनी केले तर संमेलनाध्यक्ष म्हणून सिक्कीमचे माजी राज्यपाल व थोर विचारवंत डॉ. श्रीनिवास पाटील व स्वागताध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत ऍड. गौतम सरतापे यांनी भूमिका बजावली. सदर साहित्य संमेलनास मुख्य अतिथी माजी न्यायाधीश व ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब झोडगे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर, कवियत्री ललिता गवांदे, कवियत्री नीलिमा जोशी, लेखक विनायकराव जाधव यांची उपस्थिती होती. 

“रानमोती” हा तसा “वऱ्हाड वारं” या विदर्भ पर्यटनावर आधारित काव्यसंग्रहानंतर आलेला राणी मोरे यांचा दुसराच काव्यसंग्रह असून देखील जीवन आवश्यक विषयावर अतिशय गंभीर व निरागसपणे भाष्य करणारा, अनाठाई रूढी प्रथांचा नकळत चिमटा काढणारा, आधुनिक काळातील मराठी काव्य क्षेत्रात विभागनिहाय मांडणी केलेला, प्रिंट तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेला पहिलाच काव्यसंग्रह असल्याने "साहित्य भूषण" पुरस्कारासाठी निवडला गेला असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक तथा निवड समितीचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी स्पष्ट केले. 

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलतांना राणी अमोल मोरे-उलेमाले यांनी मराठी साहित्य मंडळाचे आभार व्यक्त करीत दैनदिन मानवी जीवनास उपयोगी व प्रगतीस कारणीभूत ठरणाऱ्या जीवन उपयोगी बाबींवर लिखाणास मराठी साहित्यात प्रचंड वाव असल्याचे स्पष्ट केले. तसेच  विदर्भातील साहित्य क्षेत्राला राज्य व देश पातळीवर पुनर्जीवित करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. साहित्य क्षेत्रा व्यतिरिक्त राणी ह्या विदर्भातील गरजू लोकांना मुंबईत राहण्याची व्यवस्था करणाऱ्या विदर्भ वैभव मंदिर न्यासाच्या विश्वस्त असून कृषी व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहेत. कोरोना काळात त्यांनी मुंबईत तथा राज्याबाहेर अडकलेल्या बऱ्याच गरजू विदर्भियांना परत प्रवासासाठी मदत केली. तसेच सर्व सामन्यांच्या प्रश्नावर त्यांच्या लेखणीतून त्या परखड मत मांडत असतात. त्यांच्या साहित्य, सामाजिक व सांस्कुतिक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


************************************

1 comment:

  1. Heartiest congratulations for your Grand success with Grand Achievement. We are proud of you. All the best. God bless you. 🌹
    ACP Ashok D Goray,
    President Police Awardee
    Mumbai.

    ReplyDelete

Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.

Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts