Search This Blog

Monday, May 31, 2021

मला थोडा उशीर होईल



मी जो रस्ता निवडला आहे,
त्याचा शेवट गाठायचा ध्यास आहे
ऐकलं आहे ! 
दूर दिसणाऱ्या डोंगरा पल्याड,
त्याने वाकडे तिकडे वळण घेतले आहे
रस्ताने चालताना, 
अंधार प्रकाशाचा खेळ, 
चालूचं राहणार आहे
जातांना तुला काही सांगायचं आहे
मला थोडा उशीर होईल,
पण, मी नक्की परत येणार आहे
 
मी तुझा निरोप घेईल, 
तेव्हा सकाळ असेल
परंतु, सायंकाळ होऊन,
अंधार पडायला वेळ लागणार नाही
त्या लक्ख काळ्या अंधारात,
कोल्ह्यांची कोल्हेकुई
आणि वाघाच्या डरकाळ्याही ऐकायला येतील
तेव्हा भीतीचा थरथराट सुटून
तुझा एकटेपणचा वनवा, 
पेटायला वेळ लागणार नाही
मला थोडा उशीर होईल,
तोवर, तू तग धरून थांबशील ना ?
 
खात्रीने तू वाघिणीच्या धाडसाने
रात्रीच्या अंधाराला भिडशीलही
परंतु, सकाळच्या कोवळ्या सुंदर किरणांनी
आणि फुलांच्या सुगंधाने 
तुला मोहित केले तर
तु ज्या वळणावर मला निरोप दिला
तेथे तुझे वळण माझ्या दिशेने 
बदलायला वेळ लागणार नाही
मला थोडा उशीर होईल,
पण, तू बदलणार नाही ना ?

ध्येय प्राप्तीनंतर,
आलेल्या कटू गोड अनुभवांना 
एक एक करून उजाळत
तू दिलेल्या त्यागाला आठवत
क्षणभरातच परतीचा रस्ता पकडेल
प्रवास लांबणीचा आहे
परंतु, संपायला वेळ लागणार नाही
परत नक्कीच येणार, 
वचनबद्ध आहे !
मला थोडा उशीर होईल,
तोवर, तू वाट पाहशील का ?

- रानमोती / Ranmoti

Monday, May 24, 2021

सच का प्यादा..!

अस्थिर मन हो गया स्थिर
भीतर पाया खुद ही स्वरुप
क्या पूरा क्या बचा आधा
कुछ ना मिला खुद से ज्यादा
पवित्र निर्मल शितल छाया
कुछ और शेष ना पाया
कणखर भी फूल बने
जब वो तुझे अपने लगे
बनकर तू मन का सारथी
आचरण में फूलों की सादगी
पूजा मै वक्त क्यों करू जाया
जब तू ही पूजनीय भाया
कठोर तप बन गया साधा
हाथ लगा जब सच का प्यादा
- रानमोती / Ranmoti

Thursday, May 20, 2021

दिवस-रात्र कार्यरत असणारे 'प्रकाशदूत' - वीज कर्मचारी

    आज TAUKTAE CYCLONE च्या निमित्ताने जुन २०२० मध्ये आलेल्या महा भयावह निसर्ग चक्रीवादळाची आठवण झाली. गत वर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे तडाखा बसलेल्या महाराष्ट्र राज्यातील कोंकण किनारपट्टी लगतची वीज वितरण व्यवस्था सर्वाधिक प्रभावित झाली होती आणि ती पूर्वपदावर आणण्यासाठी महाराष्ट्रातील वीज कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात अहोरात्र प्रयत्न केले होते. त्यांच्या निसर्ग चक्रीवादळ काळातील पराक्रमाची पराकाष्टा त्यावेळी देश पातळीवर Role Model म्हणून ओळखल्या गेली. त्याच पराक्रमाची आठवण पुनः एकदा वीज कर्मचारी व अभियंते TAUKTAE CYCLONE मुळे विस्कटलेली वीज वितरण व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी घेत असलेल्या प्रयत्नातून दिसून येत आहे.

    यावेळी मात्र कोरोना महामारीच्या संकटाने अधिक रौद्र रूप धारण केले असून देखील जीवाची तमा न बाळगता कर्तव्य सर्वोतपरी मानणारे वीज कर्मचारी दवाखाने, Oxygen प्लांट यांच्यासह तुमच्या-आमच्या सर्वांच्या घरांना अविरत वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने मैदानात रणशिंग फुंकून तयार आहेत. चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आस्मानी संकटांना तोंड देणारे, सामान्यांच्या जीवनात सदैव प्रकाश म्हणून उभे राहणारे वीज कर्मचारी मात्र नेहमीच प्रसिद्धीपासून दूर असतात. याउलट काही क्षणांसाठी जर वीज बंद पडली तर त्याची सर्वमुखाने ऐशी तैशी होते. 

    जवळपास सर्वच जीवनावश्यक बाबी ह्या विजेवर अवलंबून असून देखील वीज क्षेत्राला व त्यामधील काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हिस्स्याचा न्याय कधीच मिळतांना दिसत नाही. आजही कोरोना महामारीला दीड वर्षाचा कालावधी ओलांडला असला तरी 'फ्रंट लाईन वर्कर' म्हणून त्यांना मानण्यास सामान्यांसह प्रशासन देखील उत्साही दिसत नाही. दुर्दैवच म्हणावं लागेल.

    आज TAUKTAE CYCLONE मुळे कोकणामध्ये गंभीर स्वरूपात विस्कळीत झालेले विजेचे नेटवर्क पूर्वपदावर आणण्याकरिता २४x७ कार्यरत असणारे वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी खरोखरच कौतुकास पात्र असून तुम्हा-आम्हा, सर्वांसाठी प्रकाशदूतचं म्हणावे लागतील. अंधार दूर करून प्रकाशाचं दर्शन घडविणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद

(रानमोती / Ranmoti)

Sunday, May 16, 2021

.....रडाया लागलं !


आभाळ आज धो धो रडाया लागलं
जाण्याने तुझ्या मन त्याचंही दुभागलं

भन्नाट सुटला वारा हा असा कसा
घेऊन गेला आमच्या लाडक्या माणसा
 नयनी ढगांच्या घट्ट काळोख दाटला
विजांनी कडकड दु:खी टाहो फोडला

संयमी शांत तुझ्या कर्माचे सुत्र
गावचा एक तुच लाडका भुमीपुत्र
छोट्याश्या जीवनाला तू केलं मोठं
विरोधकांनाही प्रेम दिलं जाणवलं छोटं  

गेलास तू चुकवून काळजाचा ठोका
कोणी सांभाळावं तुझ्या भाबडया लोका
दीन जणांचा कैवारी तू श्रध्देची आशा
मृत्युच्या वादळाने केली आज निराशा

गावच्या मातीत तुझ्या यशाच्या खुणा
तुझ्याविना विकास कोण घडवेल सांग ना
परतुनी ये पुन्हा आमच्या वाट्याला
मुखाग्नी दे दु:खाच्या प्रचंड साठ्याला

रिकामी जागा भरुन कशी निघणार
अंधारले डोळे सांग कधी तु दिसणार
जाण्याने तुझ्या मन त्याचंही दुभागलं
आभाळ आज धो धो रडाया लागलं

- रानमोती / Ranmoti


Thursday, May 13, 2021

रुजव जरा काळजात....


हे मराठी माणसा नको भांडू आपसात
स्वराज्य टिकविले संभाने रुजव जरा काळजात

तुकडे झाले चार पाच अन हजार
तरी नाही कुठलाच पराक्रमाचा बाजार
कसे असेल ते जगणे अन मरणे
समजून घ्यावे स्वतः सांगावे न लागणे

राजे आम्ही फक्त कहाण्या ऐकल्यात
आपण मात्र त्या प्रत्यक्षात भोगल्यात
स्वराज्याचा पेलला उरावर डोंगर
लढायांचा नजाणे कसा हाकलास नांगर

राजे आयुष्य जरी तुम्हाला लाभले लहान
जिद्द आणि धाडसाने कर्तुत्व जाहले महान
क्रूर औरंगजेबाने जरी तुमचे डोळे काढले
आत्मविश्वासाने तुमच्या मात्र त्यास येथेच गाडले

आम्ही फक्त मालिका पाहिल्यात
आपण मात्र अनंत वेदना साहल्यात
हे मराठी माणसा नको भांडू आपसात
स्वराज्य टिकविले संभाने रुजव जरा काळजात

- रानमोती / Ranmoti



Wednesday, May 12, 2021

रख रख रान..


रख रख रान
हरवला प्राण
तहानली गाय
सुकली माय

अनवाणी पाय
निरखून जाय
तापला रवी
अंगार लावी

कुठून आणू
स्वासाचा वारा
जीव झाला जणू
डोक्यावर भारा

दूरच्या रानात
काटेरी बाभूळ
फाटली धरणी
उघडं झालं मूळ

आडोसा सावलीचा
पदर माऊलीचा
कधी संपेल वनवा
कोरड्या घासाचा

रिकामी घागर
कडक दुपार
वणवण चाले नार
तुडवत शिवार

पाण्याचा टाहो
फुटला घरात
रिकामी भांडी
वाजली जोरात

माठाच्या तळाशी
पाण्याचा गाळ
गळून पडला
बाळाचा नाळ

उपाशी पोटी
गाईचं कोरडं थान
हंबरडा फोडत
हरवू लागली भान

लहानग्या वासराच्या
ओल्या झाल्या कडा
श्रीमंताच्या वाड्याला
शेणा मातीचा सडा

भांडायला देवा तुला
ना उरला त्राण
तुझं रख रख रान
माझा हरवला प्राण

- रानमोती / Ranmoti

Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts