अखंड महाराष्ट्र एक नजर
सांगते विरासत ऐका बखर
लढवय्या प्रांत माझा कणखर
देशाचा प्राण प्रसिद्ध जगभर
छत्रपती रुपी एक महाराजा
तटस्थ जणू सहयाद्री भुजा
अडवीला उसळता पामर
असो जय महाराष्ट्र गजर
मुकुट शोभिला सातपुडा
डोलती कौलतीरीं कडा
नयनी कृष्णा गोदावरी
नेसली पैठणी भरजरी
सुरेल मराठी बोली भाषा
वाजती चौघडे अन ढोल ताषा
नाशिका विराजती त्र्यंबकेश्वर
मराठवाडा मुक्कामी घृष्णेश्वर
कुलदेवता पंढरीच्या नाथा
वैभव समृध्द तो घाटमाथा
भारत मातेच्या जणू गर्भात
खनिज संपत्ती गडगंज विदर्भात
कोल्हापुरी पंचगंगा येती संगमा
जळगावी केळी दाटल्या हंगामा
कोकणी राजा रसाळ हापूस
यवतमाळी बोंडी फुटला कापूस
टोकाला सातारा अन सोलापूर
महाराष्ट्रावर जणू मायेची चादर
भिवापुरी मिरची तोफेची गोळी
स्वादिस्ट लाभली मधुर पुरणपोळी
नांदेडी आस्थापित गुरु गोविंद
यात्रा जोतिबा देई परमानंद
उल्कापाताचे लोणार सरोवर
धन्य ही महाराष्ट्राची धरोहर
पुण्याची शान शनिवार वाडा
साष्टांग नमन शिवनेरी गडा
बांधुनी केशरी स्वाभीमानी फेटा
सज्ज सिंधुदुर्ग रोकण्या लाटा
वन्यप्राणी विहार करती ताडोबा
राजधानी मुंबई सर्वांचा घरोबा
सागरी वारे वाहतात भराभरा
थंडावी महाबळेश्वर अन चिखलदरा
समुद्र सपाटी सजली रत्नागिरी
उंच डोंगरात लुप्त मुक्तागिरी
विसरुनी जगाचे ब्रह्मज्ञान
शांत बसला अलिप्त माथेरान
डोक्यावर रचला नंदुरबार
लावणी नृत्यात फटाकडी नार
करी माणसे वेडे अन खुळे
दुग्ध सरीतेत न्हालं धुळे
अकोला वाशीम मध्यघाट पातूर
शिक्षणाचं पॅटर्न प्रसिध्द लातूर
कुठे सुटली लाडकी सांगली
गोजिरी भीमा हळुवार रांगली
अनंत हा महाराष्ट्राचा वसा
सांगू तुम्हा किती अन कसा
जर दुखलं कुणाचं नाक अन घसा
लवकर घ्या कोरोनाच्या लसा
अखंड महाराष्ट्र... जय महाराष्ट्र...!
- राणी मोरे (उलेमाले)
Apratim...
ReplyDeleteJay Maharashtra..
ReplyDeleteउत्तम
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteजय महाराष् 🚩खुप सुंदर 👍
ReplyDeleteअप्रतीम👌👌
ReplyDelete