Search This Blog

Monday, April 19, 2021

रासायनिक खंताचा संतुलीत वापर - मूलभूत प्रश्नोत्तरे

  
अधिक उत्पादन वाढीसाठी रासायनिक खंताचा संतुलीत वापर करणे काळाची गरज झाली असल्याने त्यासंदर्भातील खालील काही मूलभूत बाबींची माहिती असणे उपयोगाचे ठरू शकते ! 

१. रासायनिक खते म्हणजे काय व त्याचा संतुलित वापर करणे का आवश्यक आहे ?

रासायनिक खते ही खनिज पदार्थापासुन तयार केलेली मानवनिर्मीत खते आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेल्या अन्नधान्य टंचाईच्‍या संकटावर मात करण्याच्या हेतूने, उत्पादन वाढीचे नवीन धोरण निश्चित करण्यात आले व त्याची टप्प्याटप्प्याने देशभरात अंमलबजावणी करण्यात आली. संकरित ‍‍बियाणे, कीटकंनाशके, रासायनिक खते यांचा वापर व सिंचन क्षेत्रातील वाढ हे या धोरणातील प्रमुख घटक होते. उत्पादन वाढीचे नवीन धोरण व हरीत क्रांती यामुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयमंपुर्ण झाला. परंतु रासायानिक खतांचा अधिक वापर गेल्या ५ दशकात केला गेला असल्याने आता त्याचे दुष्परीणाम जमिनीच्या सुपिकतेवर व पिकांवर दिसू लागले आहेत. परिणामी जमीन नापीक ‘मृद’ अवस्थेकडे वळत आहेत.त्यामुळे रासायनिक खतांचा अ-संतुलित वापर करतांना काही बाबी लक्षात घेणे जिकीरीचे होते जसे की ;

  • रासायनिक खतांच्या अतिरीक्त वापरामुळे जमीनीचा सामु (PH) यावर परिणाम होतो.
  • अतीरीक्त रासायनिक खते ही पीकाकडून शोषली जात नाहीत. ती जमीनीत अवीद्राव्य स्वरुपात तशीच पडुन राहतात, पावसाच्या पाण्याबरोबर जमीनीत खोलवर त्यांचा नीचरा होतो व कठीन असा HARDPACK जमीनीमध्ये तयार होतो.
  • अतीरीक्त रासायणीक खते पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जाऊन जवळच्या पाणी साठ्याला दुषीत करतात.
  • रासायनिक खतांच्या अति वापरामुळे कडधान्यामध्ये प्रथीनाचे प्रमाण कमी होत आहे. तसेच फळभाज्या आणि फळे हे दुषीत होऊन त्याचे परीणाम मानवी आरोग्यावर होत आहेत. 
या सर्व बाबी टाळण्यासाठी रासायनीक खतांचा वापर पुर्णपणे टाळणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने त्यांचा संतुलीत वापर करणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर खतांच्या वाढत्या कीमती ही देखील एक महत्त्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त वाढल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला आहे. यासर्व चक्रव्युहातून शेतकऱ्याला बाहेर काढणे अगत्याचे झाले आहे.

२. रासायनिक खतांचा वापर आणि माती परीक्षण यांचा परस्परसंबंध काय आहे ?
  • रासायनिक खतांचा वापर हा आपल्या जमीनीच्या आरोग्यावरुन आपण ठरवू शकतो. हे जमीनीचे आरोग्य कसे तपासायचे तर यासाठी आपल्या जमीनीचे वर्षातुन १ वेळा किंवा शक्य नसल्यास किमान ३ वर्षात १ वेळा तरी माती परीक्षण नक्की करावे.
  • माती परीक्षण म्हणजे शेतजमीनीतील अंतर्भूत रसायणे वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादन वाढ होते. माती परीक्षणामुळे पिकांना घावयाच्या खतांची मात्रा ठरवता येते व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण देखील करता येते.
  • पिके ही पोषणाला आवश्यक ती अन्नद्रव्ये जमीनीतुन घेतात. यापैकी नत्र, स्फूरद व पालाश ही अन्नद्रव्ये पिकांना जास्त प्रमाणात लागतात. त्यामुळे जमीनीमध्ये त्यांचे प्रमाण सतत कमी होत असते. पिकास लागणाऱ्या कोणत्या अन्नद्रव्यांची व किती प्रमाणात कमतरता आहे हे मातीपरीक्षणातुन कळते.
  • मातीच्या नमुन्याचे प्रयोगशाळेत सामू, विद्राव्यक्षार, सेंद्रीयकर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यासाठी परीक्षण केले जाते.
  • यावरुन जमीनीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे किंवा नाही हे समजते.
  • याशिवाय माती परीक्षण व पीक उत्पादन यांचे संबधावरुन पिकांना जमिनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्ये द्यावयास पाहीजेत ही माहीती मिळते.
  • खतांच्या माध्यामातून पिकांना नायट्रोजन (नत्र), फॅस्फरस (स्फुरद), पालाश (पोटशियम),कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे घटक, तर बोरेन, क्लोशिन, कॉपर, आयर्न, मँगनीज, झिंक आदि सुक्ष्म अन्नद्रव्य पुरवले जातात.
  • जमीनीतील एकुण मुलद्रव्यापैकी उत्तम पिकवाढीसाठी एकुण १७ मुलद्रव्ये/अन्नद्रव्ये प्रामुख्याने आवश्यक आहेत.
  • जमीनीतील उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण आणि पिकाची आवश्यकता पाहून खताच्या शिफारशी केल्या जातात.
अन्नद्रव्याची वर्गवारी / उपलब्ध अन्नद्रव्ये (किलो प्रति हेक्टर)

प्रमाण

से. कर्ब

नत्र

स्फूरद

पालाश

अत्यंत कमी

०.२० पेक्षा कमी

१४०

१००

कमी

०.२१-०.४०

१४०-१८०

८-१४

१०१-१५०

मध्यम

०.४१-०.६०

१८९-४२०

१५-२१

१५१-२००

थोडे जास्त

०.६१-०.८०

५२१-५६०

२२-२८

२०१-२५०

जास्त

०.८१-०.९९

५६९-६००

२९-३५

२५१-३००

अत्यंत जास्त

१.०० पेक्षा अधिक

७००

३५

३००


३. माती परीक्षणावारुन खताची मात्राकशी ठरवावी ?

  • माती पृथ:करण केल्यानंतर जमिनीमध्ये असलेल्या नत्राचे प्रमाण जमीनीमध्ये कमी असल्यास विविध पिकासाठी शिफारस केलेल्या खत मात्रेत २५% वाढ करावी. हेच प्रमाण जास्त असल्यास शिफारशीत, खत मात्रेत २५% घट करावी. मात्र, जमीनीमध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण मध्यम असल्यास पिकाच्या शिफारशीत खत मात्रा दिलेली आहे ती तशीच द्यावी.
  • याकरिता शेतामध्ये सद्या स्थितीत N, P, K चे प्रमाण माहीती असणे आवश्यक आहे.जे पिक घेणार त्याची शिफारस केलेली खताची मात्रा ठरविणे. (उदा :- कांदापीक–१००:५०:५० किलो NPK/हेक्टर)
  • त्यानंतर वापरण्यात येणाऱ्या खतात NPK चे प्रमाण माहित असणे आवश्यक.

Ø  नत्र

    • उदा. युरियामध्ये – ४६% N (नत्र), म्हणजे १०० KG युरीयामध्ये ४६ KGN (नत्र) असते. म्हणजेच २.१७KG युरीयामध्ये १ KGN (नत्र) मिळते.
    • आपल्याला जर कांदा पीकासाठी १०० KG नत्राची (N) गरज आहे तर = १०० x २.१७ = २१७ KG युरीयाचा वापर करावा लागेल.
    • माती परीक्षणामध्ये N चे प्रमाण अत्यंत कमी असेल तर ५० % वाढवून, कमी असल्यास २५ % वाढवून दयावी, म्हणजेच ५४ KG युरीया आनखी वाढवावा लागेल
    • याप्रमाणे जर N चे प्रमाण जमीनीमध्ये जास्त असेल तर युरीयाचे प्रमाण ५०% किंवा २५ % कमी करावे.

Ø  स्‍फुरद

    • उदा. SSP मध्ये १६% स्फुरद असते, म्हणजेच ६.२५ KG SSP मध्ये १ KG स्फुरद.
    • कांदा पीकासाठी आवश्यकता ५० KGम्हणजेच ३१५ KG SSP/ हेक्टर ची गरज आहे.

Ø  पालाश

    • MoP मध्ये पालाशचे प्रमाण ५८% असते, म्हणजेच १.५ KG MoP मध्ये १ KG पालाश.
    • कांदा पीकासाठी आवश्यकता ५० KG म्हणजेच ८५ KG MoP/हेक्टर ची गरज आहे.
४. सेंद्रिय कर्ब आणि त्याचे महत्व ?

  • सेंद्रिय कर्ब हा जमीनीच्या सुपिकतेचा खरा आधार असल्याने तो वाढवणे गरजेचे आहे.
  • महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे सेंद्रिय कर्ब कमी म्हणजे ०.२० ते ०.३० टक्क्यांपर्यंत आहे.
  • शाश्वत शेती उत्पादनासाठी सर्व अन्नद्रव्यांसोबत सेंद्रिय कर्बाचा समतोल राखला गेला तरच आवश्यक अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध होत असतात.
  • सेंद्रिय कर्ब जितके जास्त तितका जमीनीचा पोत.
  • त्याकरिता पिकांचे अवशेष न जाळता त्यापासून कंपोष्ट खत निर्माण केले तर जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवता येते.
५. दुय्यम खतांमध्ये सल्फरचे महत्व ?

  • सल्फर (गंधक) हा NPK नंतर चौथा महत्वाचा अन्नद्रव्य घटक आहे.
  • तेल वर्गीय पिकांमध्ये गंधकाचे शोषण हे स्फुरदापेक्षा जास्त असते.
  • भारतीय जमिनीमध्ये गंधकाची उपलब्धता कमी असल्याने गंधकाचे महत्व अधिक वाढले आहे.
  • सल्फर जिवंत पेशीमध्ये अमिनो असिड चा घटक आहे.
  • क्लोरोफिल / हरीतद्रव्य निर्मितीसाठी सहाय्यक आहे.
  • सल्फर (गंधक) हा पिकामध्ये तेल, एन्झाइम आणि विटामिन बनविण्यास मदत करतो. 
  • सल्फर हे जिप्सममध्ये १३-१४ % , बेनटोनाईट मध्ये ९० % तर पायराईट मध्ये २२ % असते.
६. एकात्मिक खत व्यवस्थापन :

जमिनीच्या सुपीकतेसाठी व सुरक्षित उत्पादनासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ज्यामध्ये रासायनिक खते, हरित खते, सेंद्रिय खते, जैविक खते यांचा योग्य समतोल साधून वापर करावा. तसेच दुष्काळी भागामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करून सिंचनातून रासायनिक खतांचा पुरवठा केल्यास ५० % खतांची बचत करता येते. शाश्वत शेती विकासासाठी खत वापराची साक्षरता निर्माण झाल्यास गुणवत्ता पूर्वक उत्पादन करणे सोपे होईल तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.


**********************************************************************************
- राणी मोरे, एम.एस.सी (कृषी), मुंबई

2 comments:

  1. मॅडम, शक्य झाल्यास सोयाबीन पिक व्यवस्थापनेवर मार्गदर्शन करावे. विदर्भात आम्ही बहुतांश शेतकरी सोयाबीन पिक घेतो.

    ReplyDelete
  2. Dear Madam, You have provided very useful information for the farmers. Thanks. I will be very happy if you could throw light on Organic farming. Thanks. ACP Ashok D Goray Mumbai.

    ReplyDelete

Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.

Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts