झुळूक येता सांजवेळी
विसावलो त्या क्षणांत
आठवूनी त्या आठवणी
हसलो उगाच गालात
होतो माणूस मी नोकरीत
चाललो मोठया तोऱ्यात
पोरी सोरी डोकाऊन पाहत
माझ्या सासऱ्याच्या वाडयात
कोणी म्हणे राजेश, कोणी विनोद
किलबिल कुमारीकांची मनात
समजून वेळ माझ्या रुबाबाची
मग्न होतो माझ्याच मी तालात
नवीन होतो नवरोबा मी
धुंदीत त्या वाहत गेलो
जळेल का कुणी आपल्यावरती
आनंद सारा लपवत गेलो
आतामात्र,
साठी केव्हाच पार पडली
कंबरदुखी भलतीच वाढली
नोकरी जरा जास्तच नडली
कहाणी माझी अशीच घडली
सुंदर आकलन.👌
ReplyDelete👌
ReplyDelete👌
ReplyDelete👌👌👌
ReplyDelete