Search This Blog

Sunday, August 30, 2020

अस्सल वऱ्हाडी सोनं - भारत गणेशपुरे


वऱ्हाडाच्या मातीतलं 
अस्सल वऱ्हाडी सोनं 
कॉमेडीच्या क्षेत्रातलं 
हुकमी झालं नाणं 

बोलीभाषेचा गोडवा 
अटकेपार नेला 
सहज विनोद करून 
भारत हिरो झाला 

आव नाही चेहऱ्यावर 
साधा भोळा संवाद 
यश जरी खिश्याशी 
सर्वांना देतो दाद

कशी असो स्क्रिप्ट 
नेतो तो धकवून 
चला हवा येऊ द्यात 
जातो आम्हा हसवून 

नुकतंच चाखवलं 
भारत्याचं भरीत 
लॉकडाऊन आमचं 
घालवलं खुशीत 

हसणं आणि दादाचं 
नातं रंगून आलं 
सिनेमात वऱ्हाडीचं 
महत्त्व वाढवून गेलं

आजवर इतकं 
नाही कोणी भावलं 
ज्यानं विदर्भाचं 
नाव मोठं केलं

म्हणून दादा तुझा 
आम्हा अभिमान 
वाढो तुझ्या रूपाने 
विदर्भाची शान 

- राणी अमोल मोरे (रानमोती)

9 comments:

  1. ख़रच भारतदादा आपल्या विदर्भासाठी वर्हाड़ी भाषेसाठी संजीवनी आहेत. खुप छान ताई.

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर शब्दात विदर्भाच्या सुपुत्राचे वर्णन केले आहे. वर्हाडी भाषा त्यांनी सर्वत्र नेली भारत गणेशपुरे आणि आपले खूप खूप धन्यवाद. शुभेच्छांसह.

    ReplyDelete
  3. Excellent acting done by Actor and comedy king of Vidarbh Bharat Ganeshpure and Excellent Poem written by smt Rani More. Heartiest congratulations to both of them. All the best and God bless them.
    Ashok D Goray Ret.ACP, President Police Awardee Mumbai.

    ReplyDelete
  4. Excellent acting done by Actor and comedy king of Vidarbh Bharat Ganeshpure and Excellent Poem written by smt Rani More. Heartiest congratulations to both of them. All the best and God bless them.
    Ashok D Goray Ret.ACP, President Police Awardee Mumbai.

    ReplyDelete
  5. Really Bharat Ganeshpure has done a great job for Varhadi Language. His efforts are remarkable. All the best Bharat ji.

    ReplyDelete
  6. विदर्भाचा भारत आहे भावी आयुष्यात भारताचा भारत होवो ही सदिच्छा

    ReplyDelete

Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.

Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts