
म्या होईन सरपंच माणूस रोकठोक
सांगतो तुम्हाले आज बोलून छातीठोक
माह्या संग हायेत जमाना भराचे लोक
आसंन कुणात दम तर लावा मले रोक
कालच म्या देल्ली बोकड्याची पार्टी
लय होती खायाले रिकामी कार्टी
सांगितलं बजावून गावराणी पाजून
मत न्हाय देल्लं तर हानीन खेटरं मोजून
पिण्याच्या पाण्याचा गावात न्हाय पत्ता
रोज पारावर भरवता डाव तीन पत्ता
निवडणुकीत तुम्ही जर देल्ला मले गुत्ता
बंद करिन तुमचा डेली गावटीचा भत्ता
अधिकाऱ्यानं देल्ल चिन्ह मले रेडा
निवडून आलो तर खाऊ घालीन पेढा
नाव माह्य पोट्यांनो गावात गिरवा
जिंदगीभर पोटभरून खासान मेवा
इकास गावचा करून ठेवला येडा
म्या करीन बरा तुम्ही परचाराले भिडा
गावाची खांद्यावर घेतली म्या धुरा
समजा मले तुमचा नेता खराखुरा
आतालोक बसवले चोर तुम्ही आणून
एकडाव इचार करा मले घ्या जाणून
काम न्हाय करणार कुणाचा चेहरा पाहून
गावासाठी झुरीन सगळे आपले माणून
परचारात पैसा लय म्या ओतला
इरोधकाचा भोंगा बंद करून फोडला
निवडणूक होईलोक आता न्हाय भांडत

एकच नम्बर ताई..
ReplyDeleteअगदी सत्य, इलेक्शन आले रे अल की गावात धुमाकूळ असतो पार्ट्यांचा. प्रत्येक घरातून एखाद उभा असते...
ReplyDeleteMast...
ReplyDeleteVery expressive
ReplyDelete