Search This Blog

Saturday, August 15, 2020

रिकामी पोरं..



रिकाम्या वेळी हातपाय मोडतो
लागली भूक की चार भाकरी तोडतो 
तुम्ही म्हणाल साले काय लेकाचे ढोरं
असेच हाव आम्ही रिकामी पोरं

ठिगळे असली तरी शान लय मारतो
मागं पुढं पाहत न्हायी राजकारण करतो
भित न्हाय कोणाले डायरेकच भिडतो
सोतासाठी न्हाय तर लोकासाठी लढतो

समाजसेवा करण्याचा लय भारी छंद
जरी असन आमची बुद्धी थोडी मंद
खिशात नाही दमडी दानवीर बनतो
मेहनतीची कमाई मात्र धाब्यावर मांडतो

हातात न्हाय पोराच्या नोकरी न धंदा
तरीही तयारच भेटन लग्नाला बंदा
घरच्यांना असते नेहमीच लगीन घाई
माय म्हणते बाळा पाहिजे सूनबाई

बैलगाड्या गेल्या अन टू व्हीलर आल्या
पाहून आमचा थाट म्हणते शेजारचा माल्या
पाय न्हाय पुरत अन शेफारला का साल्या
मंग डोकं आमचं सरकते ऐकुनी ह्या गाल्या

बस झालं माल्या लय ऐकून घेतो
लेकराला माह्या आता फोर व्हीलर देतो
मी झालो बाप अन कोणाला भितो
देशी सोडून आता इंगलीशचं पितो

तुम्ही म्हणाल साले काय लेकाचे ढोरं
असेच हाव आम्ही रिकामी पोरं

7 comments:

  1. खुप छान, अगदी स्पष्ट आकलन..
    हातात न्हाय पोराच्या नोकरी न धंदा
    तरीही तयारच भेटन लग्नाला बंदा
    👍👍👍

    ReplyDelete
  2. अप्रतिम कविता, छान मांडली.
    गावात असे लय हायेत आणि त्यायच्यामूळच गावाची शान हाये. अडल्या बिड्ल्याले तेच कामी पडतात.

    ReplyDelete

Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.

Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts