
हे सासर, सासर ऐक जरा
तुझ्यासाठी मी माहेर सोडलं
विसरून सारे आप्तगण
नवीन कोरं नातं जोडलं
हे सासर, सासर ऐक जरा
हुंड्याच्या भरतीसाठी
माझ्या माऊलीने सारं सोनं मोडलं
बापाने क्षणात त्यागून दिलं
कष्टाने जे आजवर मिळवलं
जन्मदात्यांची मी जरी असेन
लाडाची एकटीच लेक
होऊन एकरूप तुझ्यात
संसार नवऱ्याचा करेन नेक
तरीही पैश्यांसाठी तुझ्या अंगणात
सांग ना रे, होईल का माझा घात ?
हे सासर, सासर सांग ना रे
होईल का माझा घात ?
- रानमोती / Ranmoti

मनाला भिडनारी भावपूर्ण कविता.
ReplyDelete