एका उपाशी डोंगरानं खाल्लं माझं गाव
जगाच्या नकाशावर पुसलं त्याचं नाव
सुनी सुनी वाटे रिकामी आता जागा
डोंगराने पाडल्या जणू हृद्यात भेगा
मानवाने दिल्या होत्या कटूत्वाच्या जखमा
त्याच्याच मोजल्या आज त्यांनी रकमा
तांडवाची डोंगराला आली होती लहर
सोसू नाही शकलं गाव त्याचा कहर
सकाळी पडला होता आंगणात सडा
मन हलवुन गेला पाहुन तो रडा
सारं गाव दडलं डोंगराच्या गाळात
कोणी नाही सुरक्षित कुठल्याच माळात
गाई गुरे निजली होती गवताच्या उशीत
डोंगरानं घेतलं त्यांना आपल्याचं कुशीत
सकाळची एसटी आली होती रस्त्यावर
पण गावच नव्हतं आज त्याच्या पत्त्यावर
रानमोती काव्यसंग्रहातून.....
©Rani Amol More
मनावर आघात करणारा तो प्रसंग आज डोळ्यात पाणी आणुन गेला. खूप छान मांडनी.
ReplyDeleteमाळीन दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांना विनम्र अभिवादन..
ReplyDeleteअप्रतिम 👌👌👌
ReplyDeleteखूप छान मांडणी👌👌
ReplyDeleteखूपच भावस्पर्शी रचना.
ReplyDeleteवाचून संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
खूपच छान तो प्रसंग जसाच्या तसा उभा केला डोळ्यासमोर!अप्रतिम
ReplyDeleteअप्रतिम कविता , उल्लेखनीय ‘ ��
ReplyDeleteखूप छान दीदी ������
ReplyDeleteमन हलवुन गेला पाहुन तो रडा
ReplyDelete.. भावना प्रधान लिखान.👌
अप्रतिम मांडणी, भावना प्रधान काव्य 👍
ReplyDeleteAPRATIM..
ReplyDelete