बाई एसटी माई सांग कव्हा येशील
डोस्क्यावरचं गठुडं गावी कव्हा नेशील
वाट पाहत बसलो कव्हाचं फाट्यावर
आता तरी ये आम्हा गरीबाच्या वाट्यावर
बाई एसटी माई सांग कव्हा येशील
खाजगी गाड्या आता परवडायच्या नाही
तुह्याशिवाय दुसरं गाव दावायचं नाही
लय दिवसाचं खोळंबलं लेकीचं लेकरू
केव्हा भेटवशील बाई गायीला वासरू
बाई एसटी माई सांग कव्हा येशील
तालुक्याला जाऊन कागदपत्रं काढायची
पेरणीसाठी कर्जाची विनती हाय करायची
शाळाविना पोरं उगाच फिरतात संटी
आता तरी वाजू दे रोजची तुही घंटी
बाई एसटी माई सांग कव्हा येशील
कामाचे झाले वांदे थांबलेत आठवडी बाजार
रिकाम्या खिश्यासंग माणसं झाली लाचार
कानाला सवय लागली तुह्या आवाजाची
तूच हाये खरी रक्तवाहिनी आमच्या गावाची
बाई एसटी माई सांग कव्हा येशील
डोस्क्यावरचं गठुडं गावी कव्हा नेशील
- राणी अमोल मोरे
डोस्क्यावरचं गठुडं गावी कव्हा नेशील
वाट पाहत बसलो कव्हाचं फाट्यावर
आता तरी ये आम्हा गरीबाच्या वाट्यावर
बाई एसटी माई सांग कव्हा येशील
खाजगी गाड्या आता परवडायच्या नाही
तुह्याशिवाय दुसरं गाव दावायचं नाही
लय दिवसाचं खोळंबलं लेकीचं लेकरू
केव्हा भेटवशील बाई गायीला वासरू
बाई एसटी माई सांग कव्हा येशील
तालुक्याला जाऊन कागदपत्रं काढायची
पेरणीसाठी कर्जाची विनती हाय करायची
शाळाविना पोरं उगाच फिरतात संटी
आता तरी वाजू दे रोजची तुही घंटी
बाई एसटी माई सांग कव्हा येशील
कामाचे झाले वांदे थांबलेत आठवडी बाजार
रिकाम्या खिश्यासंग माणसं झाली लाचार
कानाला सवय लागली तुह्या आवाजाची
तूच हाये खरी रक्तवाहिनी आमच्या गावाची
बाई एसटी माई सांग कव्हा येशील
डोस्क्यावरचं गठुडं गावी कव्हा नेशील
- राणी अमोल मोरे
बाई एसटी माई आमच्या गावी कधी येशील..
ReplyDeleteKhup chhan garibanchi may ahe sT ,ya corona kalatil khar wastav samor anlay
ReplyDeleteGarib kay,srimant kay. Saglyanchi vaat lagli ashe ya lockdown mule.Pan gavkaryanchi vyatha chan mandali aahe.
ReplyDeletelal Dabba...lifeline of villages... Ironically struggling to survice on recent days
ReplyDeleteएस टी शिवाय खूप परिवार अपूर्ण आहेत.आजवर ह्या एस टी नी कित्येक IAS IPS MLA MLC घडवले.
ReplyDeleteअप्रतिम वाक्यरचना...👌👌👌
Excellent Poetry
ReplyDeleteअत्यंत समर्पक आणि वास्तवदर्शी कविता आहे, लासल परी आणि गावकरी यांचे अतुट नाते पूर्णपणे जाणवून दिले आहे.सुंदर
ReplyDeleteअद्भुत,
ReplyDeleteलॉकडाऊन, गावातील नागरिकांची परिस्थिती, एस टी चे महत्व अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. छान मांडणी.
वास्तववादी दुनियेत जाणारी कविता.
ReplyDeleteखरं ग्रामीण भागाचे दर्शन घडविणारी कविता... छान कल्पना.. नाव समर्पक....all the best..
ReplyDeleteअगदी बालपनीच्या आठवनी ऊजाळल्या, गावाच्या फाट्यापर्यंत धावत येऊन शाळेला जाण्यासाठी ST ची वाट पाहत बसनं ती मजाच वेगळी होती. छान रचना..
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete