Search This Blog

Saturday, July 25, 2020

अशी बायको भेटली का ?



दिवसभर करून वदवद
तरीही हसते गदगद
साधी भोळी आहे राहाया
सुंदर सुंदर तिची काया
सांगा बरं तुम्हाला
अशी बायको भेटली का ?

फोनवर तिची नुसती बडबड
रागात मोडते बोटं कडकड
पाय घसरून रोजचं पडते
दिवसात एकदातरी मुळूमुळू रडते
सांगा बरं तुम्हाला
अशी बायको भेटली का ?

खाऊन खाऊन झाली लठ्ठ
साड्यांसाठी करते हट्ट
मेकअप चढवून हळूच लाजते
मला मात्र वाघीण भासते
सांगा बरं तुम्हाला
अशी बायको भेटली का ?

रोजचीच असते तिची कुरकुर
ठरलेला असतो एकच सूर
मी आहे म्हणून निभावलं
म्हणते तुम्ही काय कमावलं
सांगा बरं तुम्हाला
अशी बायको भेटली का ?

छटाकभर काम दिवसभर पुरवते
एकच माळ सगळीकडे मिरवते
कशी असली तरी तीच माझी शान
सोबत आहे म्हणून नाही कशाची वाण
सांगा बरं तुम्हाला
अशी बायको भेटली का ?

- राणी अमोल मोरे


7 comments:

  1. छान वर्णन 👌

    ReplyDelete
  2. गोड चिमटा 😜

    ReplyDelete
  3. खरंच संसाराची गाडी व्यवस्थित चालण्यासाठी दोन्ही चाके भक्कम असावी लागतात.एका चाकावर ही गाडी चालणे अशक्य आहे.खूप छान कविता!

    ReplyDelete
  4. माझ्या लग्नवाढदिवसाची भेट. धन्यवाद

    ReplyDelete
  5. Khup Sundar!!!

    ReplyDelete
  6. Khup Sundar!!!

    ReplyDelete

Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.

Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts