
सामान्यांच्या हक्कासाठी
रान सारं पेटवून
दिनरात झटणारा
सांगा बरं तुम्हाला
असा माणूस भेटला का ?
तहान भूक विसरून
विरोध साऱ्यांचे झुगारून
सत्यासाठी पेटणारा
सांगा बरं तुम्हाला
असा माणूस भेटला का ?
ज्ञानाने भरली त्याची ओंजळ
अज्ञानाचा जरी असला गोंधळ
तग धरून उभा राहणारा
सांगा बरं तुम्हाला
असा माणूस भेटला का ?
बघून त्याची जिद्द अन तळमळ
सूज्ञांचे वाहतात अश्रू खळखळ
सत्कर्माने देवरूप पावणारा
सांगा बरं तुम्हाला
असा माणूस भेटला का ?
- राणी अमोल मोरे

अशी मानसं फक्त ईतिहासात मिळतात.
ReplyDeleteअजुन तरी नाही
ReplyDelete