देवा या सुंदर धर्तीवर
मी घेतला पहिला श्वास
आनंद बहरला हृदयात
मी क्षणात विस्मरला
त्या स्वर्गातला निवास
देवा या सुंदर धर्तीवर
मी घेतला पहिला श्वास
प्रकाशले नवीन जग
उघडता नयन ते कोरे
माझ्या कोमल देहाला
स्पर्शुनी जाई गार वारे
देवा या सुंदर धर्तीवर
मी घेतला पहिला श्वास
कंठातल्या स्वरांनी
गुंजल्या चारही दिशा
प्रथम अनुभवास आली
दिवसामागची काळी निशा
देवा या सुंदर धर्तीवर
मी घेतला पहिला श्वास
भावला किती तो मज
मायेचा प्रेमळ स्पर्श
एकटेपणाचा वास संपला
पाहताच माउली झाला हर्ष
देवा या सुंदर धर्तीवर
मी घेतला पहिला श्वास
- राणी अमोल मोरे
भावना प्रधान काव्य.
ReplyDeleteKhup sundar, thanks a lot for such a wonderful composition
ReplyDelete