कष्टाने तुझ्या रे सजलं शिवार
नटली धरणी झाला किती भार
हाकेला सर्जा राजा तुझ्या आज
मुके सवंगडी घाली स्वप्नाला साज
आहे रे तू माझ्या जीवाचा पोशिंदा
भरगोस धान्य पिकेल तुला यंदा
डोळ्यात तुझ्या कष्टाची ती झोप
घाई घाई उगवलं हिरवं रोप
बघताच तुला शेताच्या बांधावर
डुलु लागलं रान वाऱ्याच्या झोतावर
आहे रे तू माझ्या जीवाचा पोशिंदा
भरगोस धान्य पिकेल तुला यंदा
वाढलं पिक जणू लेकरू वयात
पाहून त्याला बाप सुखी होई मनात
राखणासाठी तुझा दिनरात पहारा
ढगाचे नयन भिजले पाहून पसारा
आहे रे तू माझ्या जीवाचा पोशिंदा
भरगोस धान्य पिकेल तुला यंदा
डोळ्यातल्या मायेने शिवार पिकलं
त्यागाच्या त्या मातेने पिवळं नेसलं
राजा तुझ्या कुळाला पोटभर घास
हाच त्या मातीचा दिनरात ध्यास
आहे रे तू माझ्या जीवाचा पोशिंदा
भरगोस धान्य पिकेल तुला यंदा
- राणी अमोल मोरे
#सजलं शिवार गीत
ह्रुदयस्पर्षी कविता 👌
ReplyDeleteबळीराजाला समर्पित उत्तम काव्य.
ReplyDeleteHeart touching poem..
ReplyDeleteBest....
ReplyDeleteशेतकरी राजाला नैसर्गिक संकटातून धीर आनी आधार देणारी तसेच सुखद आशेचा किरण दाखवणारी एक उत्तम कविता ..
ReplyDeleteVery nice description👌
ReplyDeleteखरच भरगोस धान्य पिकेल यंदा
ReplyDeleteखरच भरगोस धान्य पिकेल यंदा
ReplyDeleteखूपच जिवंत काव्य.शेतात जाऊन बळीराजाला भेटून आल्याचा भास झाला! छान
ReplyDeleteVery nice 👌
ReplyDelete