कर्म हाच धर्म, असे मानवा
जीवनाचा एकचं, मार्ग नुसता
सार्थ तो विचार, फुले अंतरी
सत्यासी लाचार, न करता
स्वार्थी ते जीवन, करी अमंगल
इतरांची सेवा, तुच्छ लेखता
नको रूढी प्रथा, ज्या अनाठाई
सोडुनी द्याव्या, हित जाणता
बोले मन आज, द्यावा आधार
सर्वांसी प्रेमाने, द्वेश न धरता
मिळाला जन्म, करूया सार्थ
समजूनी धर्म, जाणू विधाता
- राणी अमोल मोरे
कर्म हाच धर्म
ReplyDeleteएकदम बरोबर
छान विचार 👌
ReplyDelete