आमच्या जवळ होतं शिदोरीचं ओझं
उघडून मात्र कधी पाहिलंच नाही
दुसऱ्यांचे डबे बसलो न्याहाळत
भूक मरून गेली कळलंच नाही
आयुष्यभर पुरेल असा मौलिक सार
शिदोरीत आमच्याही बांधला होता
उगाच समजून घेतला जीवावर भार
जो आम्हीच खाऊन जगायचा होता
अपार कष्ट सोसून त्यांनी जुळवला
मायेपोटी अमृताचा एक एक घास
सुख समृद्धीसाठी होता तो जिव्हाळा
आम्ही सोडला घेऊन वरवरचा वास
✍ राणी अमोल मोरे
उघडून मात्र कधी पाहिलंच नाही
दुसऱ्यांचे डबे बसलो न्याहाळत
भूक मरून गेली कळलंच नाही
आयुष्यभर पुरेल असा मौलिक सार
शिदोरीत आमच्याही बांधला होता
उगाच समजून घेतला जीवावर भार
जो आम्हीच खाऊन जगायचा होता
अपार कष्ट सोसून त्यांनी जुळवला
मायेपोटी अमृताचा एक एक घास
सुख समृद्धीसाठी होता तो जिव्हाळा
आम्ही सोडला घेऊन वरवरचा वास
✍ राणी अमोल मोरे
©Rani Amol More
वैचारिक शिदोरीच छान विश्लेषण👍👍
ReplyDeleteसुंदर काव्य ! ��
ReplyDeleteखूपच छान!
ReplyDeleteफारच छान. अध्यात्मिक विचार.
ReplyDeleteछान 👌
ReplyDeleteबरोबर 👍
ReplyDelete