माझ्या बळीराजासाठी महत्वपूर्ण माहिती
ऐका हो ऐका बळीराजा
पुरे आता युरियाचा गाजावाजा
युरिया नसे मुख्य खत
का त्याची लाविता पिकास लत
युरिया बनुनी पूरक खत गोड
देई संयुक्त खतातील नत्रास जोड
एकरी एक गोणी हाच नियम पाळा
अनाठाई युरिया खरेदी आता टाळा
युरिया खताचा जादा वापर
किडीला निमंत्रणाचं फुटेल पाझर
अमोनियम सल्फेट पर्याय दुसरा
युरिया खताला आतातरी विसरा
अमोनियम सल्फेट करी हळुवार पोषण
युरियाचे मात्र हवेत होई शोषण
युरियाशिवाय खताचा पहिला डोज होई शक्य
२०:२०:०:१३ च्या दोन अन Mop ची अर्धी गोणी लक्षात ठेवा वाक्य
✍राणी अमोल मोरे
©Rani Amol More
खूप महत्वाची माहिती मॅडम धन्यवाद
ReplyDeleteयूरियाचा सर्रास वापर होतो. प्रमानात वापर महत्वाचा. ऊपयूक्त आहे.
ReplyDelete