पोटभर अन्न देणारा
बळीराजा माझा देव आहे
देशासाठी छातीवर गोळ्या खात
क्षत्रूचं भक्षण करणारा
सैनिक माझा देव आहे
ज्ञानाची कवाडे उघडून
सर्वांगीण विकास दाखवणारा
खरा शिक्षक माझा देव आहे
बुद्धीच्या कक्षा विस्तारून
जगणं सुखमय करणारा
संशोधक माझा देव आहे
स्वत:च्या अंगावर आजार घेत
सर्वांना उपचार देणारा
आरोग्य कर्मचारी माझा देव आहे
घाणीची गटारं साफ करून
परिसर स्वछ ठेवणारा
सफाई कामगार माझा देव आहेजीवाचं रान करून
प्रामाणिकपणे काम करणारा
लोकसेवक माझा देव आहे
वनराईचे महत्व जाणून
वृक्षारोपण व संगोपन करणारा
वृक्षमित्र माझा देव आहे
पर्यावरणावर प्रेम करून
त्याचे अस्तित्व टिकविणारा
निसर्ग प्रेमी माझा देव आहे
प्राणिमात्रांवर प्रेम करून
त्यांचे स्वातंत्र्य जोपासणारा
प्राणीमित्र माझा देव आहे
श्रीमंत आणि गरीब भेद न करता
सर्वांना सामान वागणूक देणारा
प्रत्येक नागरिक माझा देव आहे
गोर गरिबांच्या प्रश्नांसाठी
वाचा बनून लढणारा
समाजसेवक माझा देव आहे
माझ्या देवाची इतकी सुंदर रुपं
ज्यांनी ज्यांनी स्विकारली
तो प्रत्येक मनुष्य माझा देव आहे
- राणी अमोल मोरे
देवाची रूपे खूप छान मांडली आहेत.. अर्थपूर्ण काव्य मॅडम..
ReplyDeleteVery true.. 👍
ReplyDeleteJay Jawan, Jay Kisan, Jay Vigyan.....��
ReplyDeleteखर आहे. मानसताच खरा देव आहे.
ReplyDeleteखूप छान...!
ReplyDeleteहेच आमचे खरे देव...खुप छान
ReplyDeleteछान कविता...
ReplyDeleteठिकठिकाणी असलेला, भावलेला देव...
सुंदर कल्पना👌👌👏👏
सुंदर विचार
ReplyDelete