...कश्या फुलतील वेली ?
गर्भपात गर्भपात ठराव पास केला
शब्द पडताच कानी श्वासाचा अंत झाला
भंगता स्वप्न पुत्र प्राप्तीचे दिली मज शिक्षा
न उमजले मज पुत्राचीच का मागावी भिक्षा
नाव कळण्याआधी सरिता वनिता की माला
भव्य स्वप्नांचा क्षणातच अंत झाला
वेदना हळहळल्या अश्रूही तापुनी वाहले
इवल्याश्या डोळ्यांनी आईबाबांचे स्वप्न पाहले
उत्तरार्धात पुत्र तुमचा करेल जेव्हा बेहाल
पश्चातापाने मग भिजतील तुमचे गाल
बेटी बचाव बेटी पढाव अनंत गुंजली नारे
निर्घूण कृत्याने तुम्हा जग वेडे म्हणेल सारे
धन तुमचे हेच खरे दिव्य रत्न कन्या
आदिशक्ती प्रतिभा अन तीच सुंदर लावण्या
प्रश्न एकच मनी दाटला कन्या जन्माआधीच गेली
तर सृष्टीत कश्या फुलतील वेली ?
...कश्या फुलतील वेली ?
भावनांना पाझर फोडणारी मार्मिक कविता. अतिशय गंभीर विषय सहजतेने मांडला आहे, 🙏🙏🏾🙏
ReplyDeleteवा खूपच छान!
ReplyDeleteछान
ReplyDeleteगंभीर विषय छान हाताळला.
ReplyDelete