आज तिचा चेहरा थोडा सुकला होता
माझा अख्खा दिवस तिच्या हसण्यावाचून मुकला होता
दिवस होता तसा सुट्टीचा, गप्पा अन गोष्टींचा
नजाणे कुठला काटा तिला खुपला होता
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता..
बसली होती खाली, हसू नव्हते गाली
डोळयात आलेला आसू पटकन तिने पूसला होता
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता..
वातावरण होतं थंड, कुठलच नव्हतं बंड
ओठात आलेला शब्द माझाही आज नमला होता
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता..
दिले नव्हते पाणी, शांत होती गाणी
नजाणे कुठला शब्द तिला आत रुतला होता
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता..
जेवण होतं अळणी, मिळत नव्हती गाळणी
सकाळपासून मौनातच जीव तिचा गुंतला होता
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता..
सुकली होती फुले, रडत होती मुले
सततचा नियम तिचा बराच काही चुकला होता
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता..
काहीच नव्हतं ध्यानात, विसरत होती क्षणात
रोजचा तिचा स्वभाव आज कुठेतरी हरवला होता
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता..
सुट्टीची असते मजा, पण आज होती सजा
माझा सारा दिवसच आनंदाविना हुकला होता
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता..
मनवायची माझी शर्थ, झाली होती व्यर्थ
न हसण्याचा कटच जणू तिने बांधला होता
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता..
तिचं मैत्रिणीच बिनसलं होत, भांडण थोडं गाजलं होतं
हे सारं कळताच मात्र विचार माझा थांबला होता
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता
माझा अख्खा दिवस, तिच्या हसण्यावाचून मुकला होता
एक सुंदर रहस्य निर्माण करणारे शब्दांकन..
ReplyDelete