नावामागे तुझ्या..
धुंदलेले माझे स्वप्न जुने
बाळा तुझ्या कोऱ्या डोळयात पाहतो
जगी साऱ्या गुंजेल कीर्ती
नावामागे तुझ्या नाव माझे लावतो
ठेच खाऊन पडलो मी जिथे
रस्त्यावर त्या आज तुला सावरतो
थकुन माकून हरलो मी जिथे
तेथुन तू आज भरधाव धावतो
नावामागे तुझ्या नाव माझे लावतो
अशक्य जे जाहले माझ्यासाठी
कष्टाने तुला सहज शक्य करतो
राहुन गेली कमी जी माझ्यात
सारी तुझ्या रुपात आज शोधतो
नावामागे तुझ्या नाव माझे लावतो
राहुन गेलेले जगणे माझे
तुझ्या रुपाने पूर्ण जगतो
साथ नव्हती गरजेला माझ्या
तुझा हात मात्र घट्ट धरतो
नावामागे तुझ्या नाव माझे लावतो
छान
ReplyDeleteSuperb
ReplyDeleteGreat very nice..
ReplyDeleteमस्तच!
ReplyDeleteखूप छान...������
ReplyDeleteAtti sundar..
ReplyDeleteअप्रतिम!
ReplyDelete