अंतरी
मानवा अंतरी शोधना
चित्त तुझे ध्यानी लागले
भय यातना अंत पावल्या
करूना त्या डोळ्यात वाहिल्या
देव जाहला मन मंदिरा
न शोधला कुणी दुसरा
तू रमता बाह्य स्वरात
अंतरी नाद दाटूनी आले
दुखः मिळाले असल्यात
सत्याने सुख शोधुन पाहिले
तू जसा फुलला अंतरी
पडू दे प्रतिमा बाहेरी
नको अडकू खोट्या रुपात
तू शोभशी तुझ्याच स्वरुपात
कर्माने मिळाले तुजला
जाण त्या निष्ठेला
नको शाश्वताच्या वाटी
ना उरेल काही पाठी
जाण तू ज्ञान महान
ना कोणी मोठे लहान
ठेविले ज्याने भान
त्यासी मिळे निर्वाण
अंतरी..अंतरमनाचं अवलोकन करण्यास प्रेरित करणारा छान प्रयत्न..
ReplyDeleteछान आहे लेख...मस्त मॅडम
ReplyDeleteमनच सर्व सिद्धीचे कारक आहे महनुन मन सदैव प्रसन्न ठेवावे हे सांगण्याचा छान प्रयत्न केलेला आहे.
ReplyDeleteVery Nice,last butone is really True.
ReplyDeleteखूप आशयघन काव्य आहे. भारतीय संस्कृतीला अभिप्रेत असे उदात्त तत्त्वज्ञान मांडले आहे.शेवटच्या कडव्यावरून संत कबीरांचा एक दोहा आठवला.
ReplyDeleteजाती न पूछो साधू की, पूछ लिजियो ग्यान।
मोल करो तलवार का,पडा रहन दो म्यान ।।
मनःपूर्वक शुभेच्छा.!
- अभिजित कुलकर्णी
अर्थपूर्ण कविता, मनाला भावून जाते...!!!
ReplyDelete👍👍
ReplyDeleteछान कविता
ReplyDeleteऊत्तम , अप्रतिम कविता
ReplyDeleteमन हेच सर्व सुख आणि पिडांचे कारक आहे.. अंतरी अप्रतिम
ReplyDelete