डीपी
डीपी तुझा किती सुंदर
कुणाची नजर लागेल
आज तू एक वेळेला
जेवली नाही तरी भागेल
गॉगल लावून किती
छान देतेस तू पोज
जरी चेहऱ्यावर असले
चपटे चपटे नोज
दिवसभरात दहा वेळा
डीपी तू बदलते
दुसऱ्याची पाहून लगेच
तुझी का गं सलते
नवीन नवीन कपड्याची
खरेदी तू करतेस
वेगळी फॅशन दिसताच
मनाशीच झुरतेस
चालू दे जोरात
तुझा वरवरचा थाट
फॅशन च्या नादात
लागू दे सेविंगची वाट
- राणी अमोल मोरे
सत्य कथन..🤪
ReplyDelete