घामाचे मोती
जाम घाम तुला आला
बस थोडा विसाव्याला
आहे काळजी देणाऱ्याला
उगाच चिंता कशाला
उगवेल सूर्य पहाटेला
येईल यश तुझ्याही वाटेला
फुलेल फूल देठाला
मिळेल भाकर पोटाला
शक्ती माती पोसण्याची
गरज फक्त पाण्याची
होईल जमवाजमव दाण्यांची
हीच वेळ तग धरण्याची
शिगोशिग भरतील पोती
आनंद फुलेल तुझ्याही भोवती
होतील तुझ्या घामाचे मोती
मग सारे सुखाने नांदती
Beautiful 👌😇👌
ReplyDeleteExcellent
ReplyDeleteGreat
ReplyDeleteNice
ReplyDeleteSuperb.....
ReplyDeleteSuperb....
ReplyDeleteExcellent
ReplyDeleteMind-blowing
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteExcellent
ReplyDeleteMotivational lines.... Superb...
ReplyDeleteएक नंबर..
ReplyDelete