..नकोस
सुसाट सुटलाय वारा
म्हणून तू हेलकावू नकोस
उगाच स्वतः स्वतःला
संपण्याची भीती दाखऊ नकोस
पाणी जरा हेलकावले
म्हणून नाव तुझी बुडवू नकोस
सोन्यासारखी स्वप्ने
उगाच धुळीगत उडवू नकोस
कोणी आठवत नाही
म्हणून स्वतःला विसरु नकोस
जिव्हाळ्याचे प्रेमपुष्प
असेच मनात दवडू नकोस
ऋणानुबंध फुलवून मनांचे
सुकल्यागत वागू नकोस
द्वंद्व मनाचे छेडून
एकट असं सोडू नकोस
इच्छांना पंख देऊन
उडण्यास नाही म्हणू नकोस
स्वप्नांना वाट देऊन
झोप अशी उडवू नकोस
शोधत साथ कुणाची
सैरावैरा भटकू नकोस
गुंफुनी गीत मनाचे
अर्धवट थांबवू नकोस
देऊन स्पर्श फुलांचा
काटे रुतवू नकोस
कर तू कल्पना आनंदाची
दुःखास विसरण्याची
बघ त्या डोंगरापलीकडे
लवकरच सूर्य तेवणार आहे
आजची रात्र संपुन
उदयाची पहाट उजाडणार आहे
No comments:
Post a Comment
Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.