जलतत्त्व
तू तत्त्व एक निसर्गाचे
तू रूप पंच महाभूताचे
तुझ्या विना जीव अतृप्त
तू धरणी गाभ्यात गुप्त
ढग फुटला वारा दाटला
जणू महाप्रलय थाटला
खळखळत नाथ केदार गाठला
भूईवर तुच तू साठला
केले क्षणात भुईसपाट
ना सोडली कुणा वहिवाट
विसकटता घडी निसर्गाची
मिळे शिक्षा चिर समाधीची
अस्तित्व जरी महान
पिण्यायोग्य जल लहान
कळेल मानवा महत्त्व
लयास जाता जलतत्त्व
काव्य वाचतांना केदारनाथ मधील महाप्रलय डोळ्यांसमोर उभा ठाकला. पाण्याचे अस्तित्व खुप विशाल आहे तरी देखील पिण्याच्या पाण्यासाठी वनवन आहे. सेव वाटर, सेव लाईफ..💧💧💧
ReplyDeleteखरंच आज मुंबईत पावसाने महाप्रलयच थाटला..
ReplyDeleteजल ही जिवन है...
ReplyDeleteSave water, Save life🙏
Apratim….
ReplyDelete