भक्ता ! काय ते भले
'देवा तू उभाच’ अजून कसा रे दमला नाही
विटेवरच्या विठ्ठलाला भक्त कधी बोलला नाही
पंढरपुरी वारी करण्या मात्र कधी डगमगला नाही
वरवरचा जप सोडता 'सत्य' कधी समजलाच नाही
चंद्रभागेत डुबक्या मारून पाणी करतो घाण
विठ्ठलाची पंढरी भक्ता सांग कशी दिसेल छान
मागच्या वर्षी पाच लाख यावर्षी दहा लाख
सोडून जातात फक्त प्रदूषणाची सडकी राख
गर्वाने सांगतो आपण यात्रेला परदेशीही आले
त्यांचही मनं दुखते जेव्हा दिसतात सुंदर नदीचे नाले
लाईव्ह दाखवतात चॅनलवाले सारी ती गर्दी
घरी परतल्यावर अर्ध्यांना झाली असते सर्दी
घंटा वाजवून, टाळ बडवून तो जागा होत नाही

माय बाप सुखी नसतील तर देव कधी पावत नाही
विठ्ठलाचं देवपण आम्हाला कधी कळलंच नाही
पंढरीच्या यात्रेला सांगा अर्थ कसा उरेल काही
खुळ्या भक्तांना पाहून विठ्ठल होत असेल दंग
विटेवरून खाली न उतरण्याचा त्यानेही बांधला चंग
परंपरा सांगते पंढरीच्या यात्रेला एकदा तरी जावं
अंतर्मनाच्या शुद्धतेसाठी सर करावं पंढरपूर गावं
अज्ञानाच्या गर्दीत भक्ता सांग तू कुठे हरवलास
संतांच्या विचारांचा खडू तू का नाही गिरवलास
लोक कल्याणासाठी त्यांनी जीवन अर्पण केले
तरी तुला कळलेच नाही तुझ्यासाठी 'काय ते भले'
- रानमोती

Apratim...👌👌👌
ReplyDeleteNice 👍
ReplyDeleteनदीचेझाले नाले म्हणाली ताई तु, सांग बर मला
ReplyDeleteस्वच्छता स्वच्छता म्हणवनारे तुम्ही मुंबई पुण्यावाले,
कोरोनाच्य भीतीने का व गेले गावी पळून,
खोल अर्थ आहे वारी ला ताई, केल्या शिवाय
कळत नाही, एकात्मता, संस्कृति, एकमेकांना जीव लावणे,
सगळ्यात माऊली बघायला मिळते बाई.
चार बुक वाचून मानुस शहाना झाला कुठे,
भक्ति चा भुकेला देव असे,नाव घेता त्याचे,
मिळाला जो आनंद,बारीत पंढरिच्या उभ राहल्या शिवाय कळणार नाही
गात अभंग भक्ता संगे देव होतो दंग,पाऊली खेळत
मुखाने घ्या हो पांडुरंग तुका,माऊली चे नाव
सार्थक करा हा मानव जन्म, करुनी एकदा तरी वारी
श्री हरी माऊली श्री हरी माऊली
हेही वास्तव आहे आज
आपण जे लिहिले तेही योग्य
वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आपण नेहमी छान प्रयत्न करता, सत्यशोधक विचार आपल्या लेखनातून व्यक्त होतात.
ReplyDeleteअगदी बरोबर डाॅ साहेब,
ReplyDeleteपरंतु काही खुळ्या भक्तांना सत्य खपत नाही..
वरिल कविता सत्य कथित करते...
धन्यवाद
Deleteसंत ज्ञानेश्वर, संत सावता व संत तुकाराम यांसारख्या वारकरी संप्रदायातील संतांच्या खऱ्या शिकवणीची जाणीव करून देणारी आधुनिक कविता. आपण आतातरी समजले पाहिजे आपल्यासाठी 'काय ते भले'.
ReplyDeletekhup chan, pan andh bhaktanch kahi hou shakat nahi.
ReplyDelete