सून काय सासू काय - दोघी सेम सेम
नखरेल सुनेला बघून,
खट्याळ सासू झाली गरम
सासूने केली तोफ, दणक्यात सुरु
कोपऱ्यात मात्र, सून रडे भुरुभुरु
कशी मारली फोडणी, ठसका उडाला
मोबाईलच्या नादात पोरी, रस्सा जळाला
गोल गोल पोळ्यांचा, झाला बघ त्रिकोण
स्टेटसच्या नादात तुझं, घरात असते मौन
बेसिनमध्ये भांड्याचा, रचला केवढा कळस
तरी डिपीमध्ये सर्वांच्या, तुझाच बाई सरस
कपाटात गठ्ठा, तुझ्या हजार साड्यांचा
लेकाने भरला हप्ता, आजच भाड्याचा
मोकळ्या तुझ्या केसांची, स्टाईल लय भारी
गळतात जागोजागी, थोडी बांध त्याला दोरी
बारा बारा वाजेपर्यंत, चालते तुझी चॅटिंग
एवढ्या वेळात तर बाई, मी हजार पापड लाटीन
सून म्हणाली सासूबाई, आता सोडा जुना नाद
मॉडर्न बनून तुम्हीही, जरा द्याना मला साद
फेसबुकवर तुम्हाला, देते अकाउंट काढून
मग तुम्हीही बसाल त्यात, निवांत डोळे घालून
मग काय सुरु झाला, दोघींचा मोबाईल वाला गेम
सून काय सासू काय, आता दोघी सेम सेम
- राणी अमोल मोरे
😅 😆
Ha..Ha..Ha...
ReplyDeleteछान
ReplyDeleteChan ahe
ReplyDeleteNice👍👍
ReplyDeleteखरं तर सास महंजे सारख्या सूचना व सून महणजे सूचना नको अस असले तरी जर दोघींनी देखील एकमेकींना समजून घेतले तर नक्कीच त्या सेम सेम होऊ शकतात हे छान मांडण्यात आल्या या काव्यात!
ReplyDeleteकाळाची गरज,
ReplyDeleteदोघी सेम सेम झाल्या तर वाद नष्ट, संसार स्वादिष्ट.