एखाद्याला निसर्गाची देण असते, जळू नये त्यावर
आपल्याकडे नाही म्हणून, उगाच फोडू नये खापर
जीवनात निरंतर व चिरकाळ, असं काहीही नसतं
जातांना येथेंच टाकून जायचंय, त्यालाही ठाऊक असतं
वाहवा मिळावी म्हणून, कोकिळा कधी गात नाही
कितीही टाळ्या वाजल्या, तरी मोर पिसारा फुलवत नाही
हे ज्याच्या त्याच्या आवडीचे, पूर्वनियोजित काम आहे
पाठीशी फक्त समाधानाचे, अलिखित वेतन आहे
घेणाऱ्यावर ठरत असते, आनंदात बागडायचे
की इतरांचे बघून, हळूच तोंड मुरडायचे
म्हणतात ना फुकटातले चणे, नाही काहींना पचायचे
म्हणून स्वत:चं ठरवावे, आपण कसे खायायचे
प्रत्येकाच्या जवळ असते, काहीतरी गूढ दडलेले
इतरांच्या नादात राहते, तसेच अंतरी झाकलेले
रडत बसू नये, आपली वेळ गेली म्हणून
प्रयत्नाने नक्की मिळेल, स्वत:तच बघावे शोधून
- राणी अमोल मोरे
मस्त
ReplyDeleteMast Rani,khup chan
ReplyDeleteबरोबर मॅडम, स्वत:मधील सद्गुणांचा शोध घेतल्यास मन कधीही विचलित होत नाही.
ReplyDelete