(दिनांक ०१-एप्रिल-२०२० रोजी IJARIIT या अंतराष्ट्रीय
नियतकालीकेत प्रकाशित झालेल्या लेखाचा मराठी अनुवाद )
कोविड -१९ हा नव्याने सापडलेल्या कोरोना विषाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य रोग आहे आणि तो वातावरणीय परिस्थितीची तमा न बाळगता सर्वत्र पसरला जात आहे. हा विषाणू लहान मुलांपासून जेष्ठांपर्यंत सर्वांना ग्रासत. खासकरून ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे अश्यांना लवकर ग्रासतो. सद्या कोविड -१९ / कोरोना प्रतिबंधित करण्यासाठी कोणतेही विशिष्ट लसीकरण उपलब्ध नसल्याने संभाव्य उपचारांचे मूल्यांकन करणारे बरेच प्रयत्न जागतिक पातळीवर सुरु आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दिसून येणाऱ्या लक्षणांच्या आधारे उपचार करणे. अतिशय महत्वाचे म्हणजे सर्व संशोधकांचे एक सामान्य विधान दिसून येते की उच्च रोग प्रतिकार शक्तीचे रुग्ण त्याच्याशी लढा देऊन बरे होतात. म्हणूनच, कोविड -१९ चा उपचार करण्यासाठी उच्च रोग प्रतिकारक लस किंवा औषध विकसित करण्याची आवश्यकता आहे. उच्च रोग प्रतिकारक लस किंवा औषध तयार करण्यासाठी संशोधनास पुढे जाण्याचे काही संभाव्य मार्ग येथे प्रस्तावित आहेत.
१. कोविड -१९ / कोरोनाबद्दल सिद्ध तथ्ये
जवळपास 85% कोविड-१९ / कोरोनाचे रुग्ण त्यांच्या अंतर्गत उच्च रोग प्रतिकारक शक्तीमुळे व त्यांना दिसून येणाऱ्या लाक्षांनांच्या आधारे देण्यात येणाऱ्या पूरक औषधांमुळे बरे होतांना दिसतात तर दुसरीकडे रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांना कोविड -१९ / कोरोनाच्या संसर्गापासून स्वतःला टिकवून ठेवणे कठीण होते व परिणामी त्यांचा मृत्यू होतो. यामुळे असे सिद्ध होते की केवळ उच्च रोग प्रतिकार शक्ती प्रणालीच माणवाला औषध (एंटीडोट) / लस निर्माण होईपर्यंत या धोकादायक विषाणूपासून वाचवू शकते.
२. सध्याचे उपचार व पुढील आव्हाने
आजघडीला कोविड – १९ च्या रुग्णांवर उपचारार्थ घसा खवखवणे, खोकला, सर्दी आणि ताप यासारख्या दिसून येणाऱ्या विविध लक्षणांवर औषधोपचार केला जातो व कोरोना विषाणूच्या सक्रिय अवस्थेत रुग्ण बरा ठेवला जातो. उच्च रोग प्रतिकारक शक्ती असलेला रुग्ण कोरोना विषाणू असक्रिय होताच पूर्णपणे बरा होतो. परंतु रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या रुग्णांच्या बाबतीत कोरोना विषाणू श्वसन यंत्रणेस अकार्यक्षम करून नुकसान पोहचवितो ज्यामुळे मृत्यू अधिक संभवतो. म्हणून कोरोना आजारात उपचारा दरम्यान रोग प्रतिकारक शक्ती अधिक असणे महत्वाचे.
रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या संशोधनात संशोधक, वैज्ञानिक आणि डॉक्टरांनी खालील बाबींचा विचार करायला हवा;
अ. उच्च रोग प्रतिरोधक लस / औषधी
मानवी श्वसन प्रणालीवर परिणाम होण्यापासून वाचविण्याकरिता उच्च रोग प्रतिकारक शक्ती असणे इथपर्यंत ठीक आहे. परंतु आता प्रश्न आहे की रोग प्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल आणि उच्च-घनता प्रतिरोधक लस किंवा औषध तयार करणे शक्य आहे काय ? तर उत्तर आहे होय कारण रोग प्रतिकारक शक्ती हा संसर्ग (सूक्ष्मजंतू) विरूद्ध लढा देणारी अवयव, पेशी आणि रसायनांचा एकत्रित संयोजन आहे. रोग प्रतिकारक शक्तीचे मुख्य अंग पांढऱ्या रक्त पेशी, प्रतिपिंडे, पूरक प्रणाली, लिम्फॅटिक सिस्टम, प्लीहा, थायमस आणि अस्थिमज्जा आहेत. हे सर्व मानवी रोग प्रतिकारक शक्तीचे भाग आहेत जे कोणत्याही संसर्गाविरूद्ध सक्रियपणे लढा देतात. आपण या गोष्टींचा उपयोग एकमेकांशी संयोजित करून कोरोना प्रभावित आणि अप्रभावित व्यक्तीसाठी उच्च-घनतेची रोगप्रतिकारक लस किंवा औषध तयार करू शकतो. रोग प्रतिकार शक्ती वाढविणार्या घटकांचे भाग एकत्र करून उच्च रोग प्रतिरोधक लस / औषध तयार करणे हा संशोधनाचा एक मार्ग होऊ शकतो.
आ. उच्च रोग प्रतिकार शक्ती दाता (डोनर)
दुसरा मार्ग म्हणजे शत्रू विरूद्ध लढाई करण्यासाठी एका देशाकडून दुसर्या देशाचा सैनिक घेण्यासारखे आहे. यामध्ये कोविड -१९ / कोरोना हा विषाणू मानवी जीवनाचा शत्रू आहे आणि काही सामर्थ्यवान मनुष्य ज्यांच्या रोग प्रतिकारक शक्तीने ते या कोविड -१९ / कोरोनाशी लढा देण्यास स्वयंपूर्ण व सक्षम आहेत. अश्या उच्च रोग प्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांची आपण “दाता” म्हणून निवड करून कमी रोग प्रतिकार शक्ती असलेल्या दुर्बल व्यक्तीच्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती लस म्हणून टाकता येऊ शकते. रक्तदान करण्यासारखी ही संकल्पना सोपी आहे. परंतु दुर्बल व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी केवळ दात्याकडून उच्च रोग प्रतिकारक शक्ती कशी प्राप्त करता येईल ? त्याची लस करता येईल का ? जैविकदृष्ट्या इंजेक्शन शक्य आहे का ? इत्यादी अनेक प्रश्न संशोधकांना भेडसावतील. परंतु त्यांची उत्तरे या आधीच संशोधकांनी कर्क रोगावरील उपचार पद्धतीत दिलेली आहेत, फक्त गरज आहे अधिक प्रयत्नांची. आता वरील पैलूंचा विचार करून शास्त्रज्ञ व जीवशास्त्रज्ञ यांनी अधिक संशोधन करणे गरजेचे आहे.
३. निष्कर्ष
आता कोव्हीड -१९ / कोरोना विषाणू नष्ट करण्याकरिता वेगळ्या मार्गाने देखील संशोधनात्मक विचार करण्याची गरज आहे. कोव्हीड -१९ / कोरोना विरूद्ध लढा देण्यासाठी उच्च रोग प्रतिकारक शक्ती दात्यांकडून उच्च रोग प्रतिकारक शक्ती लस तयार करणे किंवा रोग प्रतिकारक शक्तीस कारणीभूत घटक एकत्रित करून त्याद्वारे औषध किंवा लसीचा शोध लावणे या पर्यायांचा अवलंब देखील करण्यात यावा. मानव जातीचा कर्दनकाळ ठरलेल्या कोरोना विषाणूपासून वाचवण्यासाठी वैज्ञानिक, संशोधक, जीवशास्त्रज्ञ आणि डॉक्टर यांना वरील मार्गांचा उपयोग होऊ शकतो.
- राणी अमोल मोरे
To read original article visit http://www.ijariit.com
No comments:
Post a Comment
Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.