तरुणांनी राजकारणात कशासाठी यावे...???
जगामध्ये दुसर्या क्रमांकावरील सर्वाधिक लोकसंख्या व
सर्वाधिक लोकसंखेमध्ये भन्नाट अशी तरुणांची संख्या म्हणून नावारूपाला
आलेला आपला “सारे जंहासे अच्छा, हिंदुस्ता हमारा”, म्हणजेच भारत देश. अशा या बलाढ्य भारत देशामध्ये दोन
महत्वाच्या गोष्टी त्या म्हणजे तरुण आणि राजकारण. या
दोन्हीही गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होत असल्याने देशाचा विकास दिवसेंदिवस मंदावत आहे. ज्या देशामध्ये तरुणांची संख्या जास्त
असेल तर त्यांचे प्रश्न, गरजा, हक्क, कर्तव्य, शक्ति आणि सहभाग देखील तितकाच जास्त. परंतु, असे असुन सुद्धा आपल्या भारत देशामध्ये
असे होताना दिसत नाही, कारण येथील तरुणाला या सर्व गोष्टींवर विचार करायला वेळ नाही, रुचि नाही तसेच, त्याला या सर्व गोष्टींचे गूढ म्हणजे फक्त राजकीय सत्ता हे
अजून उमगलेलेच नाही. मग असे असुनदेखील तरुण राजकारणात का येत
नाहीत..? या गोष्टीवर कोणी
प्रकाश का टाकला नसावा..? तर यावर उत्तर मिळेल की
तरुणांना राजकारणात रस नाही किंवा तरुणांना राजकारण सांभाळताचं येत नाही आणि जर ही उत्तरे खरी असतील तर याला दोषी कोण..? राजकारणात तरुणांची संख्या रोडवते आहे याला कोण जवाबदार..? येथील तरूनच की देशाचे वृद्धावस्थेतील राजकारण..? मी तर म्हणेल
दोन्हीही..! राजकारण यासाठी की,
आपल्या देशाचे राजकारण हे एखाद्या सणासारखे पारंपारिक आहे. ज्याप्रकारे आपण सण साजरे करत होतो आणि आताही करत आहोत त्याचप्रकारे, आपल्या देशाचे राजकारण परंपरागत घराणेशाहीने, वारसाहक्काने सुरू आहे आणि तरुण यासाठी की त्यांना राजकारणात का व
कशासाठी यावे हेच स्पष्ट झालेले नाही. परिणामी, बोटांवर मोजण्याइतके काही तरुण राजकारणात असुनदेखील त्यांचे ध्येये व
उद्दिष्टे अंधकारमयचं.
मग आपल्याला
प्रश्न पडतो तरुणांनी राजकारणात कशासाठी यावे..? सर्वप्रथम तरुणांनाची व्याख्या करूया. तरुण म्हटलं की काही ओळी आठवतात.
या उसळत्या रक्तात माझ्या,
ज्वालामूखीचा दाह दे !
वादळाची दे गती,
पण भान ध्येयाचे असू दे !!
अशाच तरुणांनी राजकारणात यावं, जे आपल्या उसळत्या आणि सळसळत्या रक्ताने देशहितासाठी कार्य करतील, त्या कार्याचे पडसाद ज्व्यालामुखीच्या लाव्याप्रमाणे
उमटवतील. वादळाच्या गतीने समोर जात राहतील आणि हे सर्व
करतांना ध्येयाचे भान मात्र नेहमी असू देतील.
कमीत कमी वेळात जर देशाला विकसित राष्ट्र बनवायचे असेल तर तरुण पिढीला राजकारणाकडे
वळावेच लागेल. कारण, कमी वेळात अधिक कार्य अचूकपणे पूर्ण करण्याची क्षमता फक्त
तरुणांमध्येच आहे. देशाला नवनवीन विचार,
संकल्पना, उद्दिष्टांची गरज आहे आणि ते फक्त तरूनच
देऊ शकतात. आजचे तरुण शिक्षणाने व तंत्रज्ञानाने सज्य असुन ते जर देशाला राजकारणी
म्हणून मिळाले तर देशाचे संपूर्ण
राजकारण हे सूशिक्षीत व ध्येयनिष्ट होइल. तरुणांचे विचार जुन्या कल्पनांनी
बुरसटलेले नसतात तर ते नवनवीन संकल्पनांनी सजलेले तेजोमय असतात. एकदा का तरुणांचा विकास झाला की देशाचा विकास झालाच म्हणून समजा, पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण त्यांचे प्रश्न
सोडवू व त्यांना समजू शकू आणि त्यांच्यावर विश्वास ठेवू. देशाच्या विकासात अडथळा निर्माण करणार्या संपूर्ण गोष्टी आपण संपून टाकु उदा. पारंपरिक व पिढ्यांपिढ्या वारसहक्काने चालू असणारे राजकारण. त्यानंतर, राजकारणात
व देशात होणारा भ्रष्टाचार मुळासकट उपटून काढू. सामाजिक विषमतेची जी दरी निर्माण झाली आहे, तीला
भरून टाकू. जातिवाद, धर्मभेद, अंधश्रद्धा यांचा विनाश करू. एवढेच नव्हे तर देशाचे शिक्षण, आरोग्य, लोकांची
आर्थिक स्थिति, गरीबी कशी सुधारेल याकडे
लक्ष देऊ. नवनवीन योजना राबवून तंत्रज्ञानाचा उपयोग करून विकास करू.
राजकारणात तरुणांनी राष्ट्रासाठी पॉलिटिक्स, पॉवर आणि बिजनेस (पि.पि.बी. फॉर आर.) हा एकमेव उद्देश जरी साध्य केला
तर देश प्रगत झाला म्हणून समजा. सपूर्ण
देशहितासाठी, समाजासाठी तरुणांनी राजकारण करावं, लोकप्रियता
मिळवावी, अनेक तरुणांना राजकरणाकडे परावृत्त करावे,
त्यांच्यामध्ये देशप्रेम व सामाजिक जाणीव निर्माण करावी,
त्यांना विकासक वं उद्योजक दृष्टी
द्यावी जेणेकरून देशाचे खर्या अर्थाने हित साध्य होईल. पि.पि.बी.
फॉर आर. हे सूत्र घेऊन तरुणाने राजकरणामध्ये पदार्पण
केले तर स्वप्नातला भारत बनणे सहज शक्य होईल. माझ्यामते देशाच्या राजकरणाला वृद्धपणाने ग्रासलेले आहे, त्याला कमजोरी आली आहे त्यामुळे देशाच्या विकासाला सुधा वृद्धपण प्राप्त झाले आहे अशा वृद्ध राजकरणाला बादलायचे असेल तर तरुणाईच ओषध द्यावच लागेल. म्हणजे, हे राजकारण आपली जुनी कात टाकून परत नव्या जोमाने प्रगती पथावर धावत सुटेल.
देशातील कुठल्याही क्षेत्रात, कुठल्याही योजनेत, कामात किंवा आणखी कोणत्याही गोष्टीत बदल घडवायचा असेल तर सत्ता सोबत असणे फार महत्वाचे आहे आणि ते फक्त राजकारणात राहूनच करता येईल. स्त्री-पुरुष
समानता या गोष्टीकडे बघण्याची आजच्या तरुणाची मानसिकता फार प्रबळ असुन आपल्या राजकारणात तिचा प्रामुख्याने
अंतर्भाव करणे त्यांना सहज शक्य होऊ शकते. आजच्या
तरुण वर्गाला बर्याच गोष्टींची चीड येते पण ते बाहेरून
ओरडन्याखेरीज दुसरं काहीही करू शकत नाहीत. म्हणून अशा तापलेल्या, गरम रक्ताला
एकदा राजकारणात उतरवून बघा म्हणजे बर्फाच्या खड्यासारखा गोठून
बसलेला हा भारत देश सळसळत्या नदीसारखा वाहायला लागला नाही तरच नवल.
जर, आपण एखाद्या वृद्ध राजकारण्याला वीचारले की
तरुण आहेत का राजकारणात..? तर त्यांच ठामपणे उत्तर असेल आहेत. ठीक आहे, असतीलही. परंतु, त्यांचा उपयोग खरच
विकासक बुद्धीने होत आहे का..?
त्यांच्या कल्पनांना, वैचारिक बुद्धीला, विकासक दृष्टीला खरचं न्याय मिळत आहे का..? फक्त,
त्यांचा आपल्या स्वार्थापोटी गैरफायदा घेतला
जात आहे का, हे तपासण्याची गरज मला मनापासून वाटत आहे.
कारण, आज राजकारणात तरुणांचा फक्त सत्ता
टिकवण्यासाठी, बड्या राजकारण्यांचे राडे सांभाळण्यासाठी, वेळप्रसंगी आपल्या सोयीनुरूप हाताळण्यासाठी फार चतुराइणे
उपयोग घेतला जात आहे. तसेच, या
सर्व गोष्टीला बळी न पडता एखादा तरुण आपल्या कार्यकर्तुत्वाने विकासक व समाजिक
राजकारण करत असल्यास त्याची चोहीकडून गळचेपी करण्याचं काम देखील तितक्याच बारकाईने
केलं जातं. जेणेकरून, तो सुद्धा त्यांच्याचपैकीच एक होण्यास भाग पडतो.
आपण नेहमी म्हणतो की देशाला आपले घर समजल पाहिजे, तेथे राहणारे सारे भारतीय
हे आपले बांधव आहेत, मग याच देशात सामाजिक व आर्थिक दरी का..? कशासाठी..? कोणी
निर्माण केली..? कोणासाठी..? तर उत्तर मिळेल वृद्ध राजकीय पुढारी किंवा परंपरागत राजकारणी. ज्याप्रमाणे घरातील लहान मुले शिक्षण घेऊन परिपूर्ण होतात
मग अशा मुलांना
आई-वडील घरातील सर्व अधिकार देऊन त्यांच्या खांद्यावर घराची धुरा
देऊन मोकळे होतात. कारण,
त्यांना माहीत असते की,
आपल्याकडे आता ती ताकत उरलेली नाही
किंवा ज्या नवीन कल्पनांची,
गोष्टींची घराला गरज आहे ती आपल्या मुलामध्ये आहे व ते सपूर्ण घर उत्तमरित्या सांभाळू
शकतात. त्याचप्रमाणे, देशाचे तरुण हे या देशाची मुले आहेत मग त्यांनाही आपल्या
घरासारखी संपूर्ण देशाची धुरा आपल्या खांद्यावर घेण्यास या वृद्ध राजकारणी मंडळीने
प्रोत्साहित करावे व स्वत: सक्रिय
राजकारणातून निवृत्त व्हावे,
तरुणांना त्यांच्या जवाबदारीची जाणीव करून द्यावी आणि तरूणांनी देखील तितक्याच
आत्मविश्वासाणे देशाची धुरा सांभाळण्यास सज्ज व्हावे. असे झाल्यास खर्या अर्थाने राज्य, राजकारण
व देश यांचा समतोल साधून सामाजिक, संस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक विकास होईल.
राष्ट्राचा
सर्व कारभार ज्या क्षेत्रातून चालतो ते हे राजकारण सध्यस्थितीत फार मलीण होत चाललेलं आहे. कारण, आजच्या राजकारण्यांचा उद्देश फक्त पैसा, सत्ता, प्रशस्ती मिळवणे आणि विरोधकांवर
कुरघोडी करून स्वत:ला श्रेष्ठ ठरविणे इतकाच उरलेला आहे. म्हणून, तरुणांनी या सर्व गोष्टींचा कटाक्षाने परित्याग करून, सामाजिक बांधिलकी जोपासून, गैरमार्गे सत्ता व पैसा यांच्या विरुद्ध बंड पुकारून, उद्योजक व विकासक भूमिका स्वीकारून,
जनसामान्यांच्या हिताचे प्रण घेऊन, राजकरणाला
विकासचं मध्यम समजून, नवजात बाळासारखी
निस्वार्थी वृत्ती ठेवून,
सकारात्मक दृष्टीकोणाने राजकारणात यावे. जेणेकरून, ज्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न सामान्य माणूस बघतो आहे ते साध्य होईल व राजकारणात
तरुणांचा वाटा खर्या अर्थाने स्पष्ट होईल.
- राणी अमोल मोरे
*******
x
very good article...
ReplyDeleteVery good article .... Unless this cast based political set up n elections do not change.... energetic youth will keep himself away from active politics Good
ReplyDeleteVery good article keep himself away from active politics good
ReplyDeleteExcellent article and very useful for the Youths of India
ReplyDeleteअप्रतिम माहिती दिली.thanks mam
ReplyDeleteExtremely good 👌👌👌👌
ReplyDelete